शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

अभंग ४८

 

आखूड मार्ग तो कारे निवडावा
सत्याचा असावा नको लोभ ||

पाया रचता स्वप्न कळसाचे
आभास मनाचे टिकेल का ||

का धावावे मागे लागे ना हातास
मनाचे ते भास मृगजळ ||

दिले जे देवाने सूख ते मानावे
लोभ का करावे मिळे माती ||

कष्ट जो करील मिळे त्या सावली
विठ्ठल माऊली पाठी उभी ||


शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

भीतीत वावरले

जन्मा आधीच मनात भीती
जन्म माझा होईल काय
मुलगा असणे हट्टा पायी
माझा बळी घेतला जाईल काय

वयात येता काहूर मनात भीतीचे
जाता येता कोणी छेड काढेल काय
प्रेम नसता एकतर्फी प्रेमातून
माझ्याबरोबर काही वेगळं घडेल काय

प्रेम केलं तरी मनात भीती
प्रेम भावना बाजूलाच राहील काय
भोळेपणाचा फायदा घेऊन
मला कोणी प्रेमात फसवेल काय

लग्न झालं तरी भीती मनात ती
सासरी कोणी समजून घेईल काय
तिथल्या रीती रूढी समजून
त्यांची मने जिंकता येईल काय

म्हातारपणी ही भीती मनात ती
पोटचा गोळा माझा सांभाळ करेल काय
ओझ या म्हातरीचं म्हणून
वृद्धाश्रमात मला धाडेल काय

आयुष्य माझे असं भितीत गेलं
वावरले मी या भितीच्याच जगात
बाहेर,घरी,शाळा कॉलेजात
भीतीला जवळ करावं कधीच नव्हतं मनात

***सचिन विश्राम कांबळे***



मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

सिंह आणि त्याचा छावा

सिंहाला म्हणाला त्याचा छावा

कमावलं काय ते सांगा बाबा

एवढे मोठे तूम्ही जंगलाचे राजा

कशा हो येतात तुम्हाला इतक्या निजा


स्वतः शिकारीला जात नाही

आम्हाला ही काही करू देत नाही

आईला तूम्ही खूप दुखवलं

शिकारीला पाठवून दमवलं


गर्जना दिवसभर देऊन देऊन

काय तुम्हाला दाखवायचं असतं

वीणा मेहनत इथे बसून राहायला

कसं हो बाबा तुम्हाला बरं वाटतं


सिंह शांत राहून ऐकून घेई

बाळाला जाणुन घायची भलतीच घाई

बघायचं बाबांनी काय कमावलं

गर्जने ने जंगल पूर्ण हलवलं


माझ्या मुळेच दहशत सारी

आईला शिकार पडत नाही भारी

उद्या माझी जगा तुझ्या साठी

दहशत जगलात ही आपल्याचसाठी


बाबांना एवढ वाईट बोललं

मुलाचं बोलणं त्यांना नाही खूपलं

आईबाबा असेच असतात

मुलांवर जीव ओवळून टाकतात


तुला या जांगळत नाही भीती

हीच आई बाबांची कमाई होती

कळलं आता बाबा आम्हाला

वाईट कधीच बोलणार नाही तुम्हाला...


**सचिन विश्राम कांबळे**



अभंग ३०

 

हे विठू माऊली मुरली मोहना

करितो वंदना पांडुरंगा ||


पडला विसर  तुझा तो रे देवा

भक्ती विसरावा कसा भक्त ||


झाला गर्व तो रे नाती विसरलो 

अलिप्त राहिलो अभागी मी ||


हाती झाली चूक द्यावी मज माफी

तू रे सर्व व्यापी दया कर ||


एकटं राहणं ना पटलं मना

समजून घेणा पांडुरंगा ||


हवी तुझी भक्ती शरण मी आलो

एकटा पडलो द्यावी साथ ||


सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

अभंग ४४

नसे मिळे येथे विना कष्ट फळ
प्रयत्न निस्फळ होत नसे ||

घडेल जीवन करे जे प्रयत्न
लाभे सुख रत्न कष्टा पायी ||

करावी ती भक्ती व्हावी मन शांती
अपेक्षा कोणती नसावी ती ||

ना मिळे ते यश मागून देवाशी
राहशी उपाशी कर कष्ट ||

कष्टाची भाकर खाण्या वाटे सुख
ना येणार दुःख जीवनी या ||



आशेत जगतो

ये माऊली धरणी माता
चरणी ठेवितो माथा
कष्ट करतो अमाप
तरी मनी भय अपयशाचे
गाळला घाम येथे
फळ मिळेल का कष्टाचे

मेघ राजा बरसला
आनंद जीवनी आला
केली ती नगरणी पेरणी
तरी मनी भय अपयशाचे
पिकेल का रे धान्य
यश मिळेल का प्रयत्नाचे

मोठे ते शेत झाले
पिक पिकाया लागले
झाली वेळ कापणीची
तरी मनी भय अपयशाचे
थैमान अवकाळी पाऊस घालून
घरा धान्य येईल का मेहनतीचे

शेतमाल बाजार भरला
माल विकाया घेऊन आला
उत्पन्न मिळेल काही त्यातून
तरी मनी भय अपयशाचे
बाजार भाव तो पडून
कौडी मोलाने ते जयायचे

तरी प्रयत्न नाही सोडे
पुन्हा उठून कामा लागे
यंदा ना उत्पन्नपुढल्या वर्षी मिळेल
आस हीच ठेऊन आशेत जगे

***सचिन विश्राम कांबळे***



अभंग ०१

किती वेळा सांगु किती घालू साद

मिळेल का दाद पांडुरंगा ||

सांगु वाटे तुला मनातले काही 

जीवा कळा येई दुःखा पायी ||

यावी तूझी स्वारी नयनी ही आस 

न्याव्हा संग धास दुःख पार ||

ओसाड जमीन पिकं ना रे धान 

कासविस मन चिंतेपायी ||

बनून तू मेघ बरसावे आज 

थोडं पाणी पाज जाये जीव ||

मना हेची वाटे तूच हरी दाता 

सांगे येता जाता दुःख हर ||

पोसावे रे कैसे घरा नाही धन 

पडे खाली मान लाचार मी ||

नाही मागे जादा मूठ भर द्यावे 

कसे तरी जावे आला काळ ||

पाहतो रे वाट पावशी तू मज 

बाळ हे रे तुझं पांडुरंगा ||


*सचिन विश्राम कांबळे*



रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

आई का ग सोडून गेलीस


सोडून गेलीस ग आई तू मला

दुसऱ्या कोणा भरवश्यावर

कसं राहू तुझ्याविना

सोडलं ग तू मला माझ्या नशिबावर


खूप आठवण येते ग तुझी आई

दुसऱ्याच्या आईत तुला शोधत राहतो

रोज तुझ्या शिवाय करमत नाही ग

फक्त तुझ्या आठवणीतच ग जगतो


का माझंच नशीब इतकं फाटकं

तुझं प्रेम मला मिळालं नाही

इतक्या लाहणपणीच झालो पोरका

का माझ्याच नशिबात नाही आई


दुसऱ्या कोणा आईला भरवताना बघितलं

की तिच्यात तूच ग मला दिसतेस

उपाशी पोटी कधी असल्यावर

भास होतो तूच मला भरवतेस


आई का ग अशी अर्ध्यावर सोडलंस

आठवण येते येणा ग तू परत

तुझ्या विना हे जगणं नकोय मला

तू नाही आलीस तर मी बसेन असाच रडत

***सचिन विश्राम कांबळे***



मला परी भेटली

मला भेटली परी
होती ती खरी खुरी
पांढरे शुभ्र वस्त्र तिचे
हातात होती छडी

पंख तिचे मखमली
उडे कसली भारी
मला ही सोबत नेले
घेतली आकाशी भरारी

फिरलो आम्ही कुठे कुठे
इकडे तिकडे हवे जिथे
झाडा वेली फुलांमध्ये
झरणे वाहतात तिथे

पक्षांबरोबर बागडलो
प्रण्यांबरोबर वावरलो
वाघ येता जंगला मध्ये
छडी फिरवून गायब झालो

किती किती मज्जा केली
समुद्राची सैर केली
माश्यांबरोबर खेळलो
थकून भागून घरी आलो

कुकरची शिटी वाजली
पटकन जाग मला आली
परी कुठेच नाही दिसली
स्वप्नात ती होती भेटली...

*सचिन विश्राम कांबळे*



शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

आसवं सुकली

 

तुझी वाट पाहत रे

त्या सांजवेळी बसली होती

आशा तुझ्या येण्याची

मनात खोलवर रुतली होती

वाटे डोळे लावून

वाट रे तुझी पाहत होती

वचने परत येण्याची तुझी ती

कूठे तरी हरवली होती

तुझ्या परतण्याचे दिवस मोजून मोजून

आसवं ही डोळ्यात सुकली होती

आस तुझ्या भेटीची आता विरली होती...


माझ्या राजसा (अंगाई)

 

नीज नीज माझ्या राजसा
माझ्या सोन्या रे पाडसा
बघ बघ रे रात्र झाली
चांदोबाची ही स्वारी आली
चांदणी आकाशी चमकती
जणू भासे दीप रे जळती

मिट पापण्या रे बाळा
आईचा तुला नाही का लळा
खेळ तुझा का रे संपेना
खुंगराचा तुझा रे पाळणा
नीज नीज माझ्या राजसा
माझ्या सोन्या रे पाडसा

दरवळली बघ रातराणी
बाळाला माझ्या पेंग आली
गोंडस बाळा ने रे माझ्या
पाळण्यात गाई रे केली
नीज नीज माझ्या राजसा
माझ्या सोन्या रे पाडसा

**सचिन विश्राम कांबळे**


फुल धमाल

व्वा ...किती छान
आज पूर्णपणे आराम
एक दिवस तरी वाचलो बुवा
धन्यवाद तुझे करतो देवा श्री राम

किती छान,मज्जा, मस्तच भारी
किती वाटतं मोकळं मोकळं
बायको असली घरात
की कसं कैद्या सारखं वाटतं सगळं

आज मस्त मित्रांना बोलाऊन
चांगला पार्टीचा बेत आखला
जेवणाला चिकन तंदुरी
आणि नाष्टयाला खमंड ढोकाला

कसलीच रोखा ठोक नाही
ना कसला डोक्याला ताप
रोजचं मरण होतं राव
जीवाची नुसती हापहाप

तू इथे असायला हवं होतं
बघ कशी एन्जॉय करतोय
तुझं माझं कधीच जमलं नाय
म्हणून एक ग्लास अजून घेतोय

तोच तिचा आवाज आला
मी इथेच हाय कुठं भी गेली नाय
जागेपणी स्वप्न  काय बघताय
माझ्या बद्दल एवढं प्रेम बघतेच हाय

तारांबळ उडाली ना राव माझी
बायकोला बघून लुंगीच सुटली
मी स्वप्नात पण बायको जोमात
जेवण मिळणार नाय जोरात म्हटली

मग काय लाडी गोडी लावली
लाजली बिचारी आणि म्हणाली
असू द्या असू द्या  करा पार्टी
उरली तर थोडी ठेवा त्यातली

डोळे बाहेर आले मग म्हणाली
चालू द्या तुमचं मस्करी नाही का करावी
असं असतं कधी थट्टा कधी मस्करी
जीवनाची गाडी अशी राव हाकावी

***सचिन विश्राम कांबळे***

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

मोबाईल

 

मीच आहे राजा झालो इथे
माणसं सारी माझी गुलाम
सर्वांवर अधिराज्य माझं
सारेच ठोकतात मला सलाम

आदेश माझा सर अखों पर
हुकूम माझे पाळावे लागते
बोलणं,बघणं,मेसेज करणं
सारं माझ्याविना शक्य नसते

बँका ही आता मीच झालो
पैसा देणे घेणे परवानगी लागते
मी नाही म्हणालो तर
देवाण घेवाण होतंच नसते

कागदपत्रे,माहिती,फोटो,संगीत
सर्वच हे माझ्यातच वसते
माणसांचा हा लेखा जोका
सारे माझ्या हातातच असते

अति वापर करून माझा
मेंदू,डोळे निकामी करून घेतले
तासोंतास वाया घालवून
तारुण्यात सारे प्रौढ झाले
हा... हाहा ..हा..हा.......हा
माणसे माझे गुलाम झाले

**सचिन विश्राम कांबळे**


गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

कोणी प्रेम करावे

दुःख माझे काय सांगू कोणाला

वेदना जळतायत खोल मनात

रोजच असं मरण होतंय

असं जगणं माझ्याच का नशिबात


रोज रात्री एक अनोळखी चेहरा

ना कोणा मध्ये दयेचा भाव ना प्रेम मनात

कोणी वासनेने भुकेलेला

तर कोणी बेधुंद झालेला व्यसनात


रोज नवीन नवीन भोगी नशिबी

कोणाला ना कळे माझ्या मनाची संवेदना

पोटासाठी मरते करावे लागते

मन जळतंय कश्या थांबवू वेदना


रोज मनात सप्न निघते घेऊन

रात्र काढते जळत्या निखाऱ्या वानी

नवा दिवस उजाडेल नशिबाचा माझ्या

आशेत या होईल कोणाची राणी


कुठे भाग्य ते माझे असे

कोणी प्रेम करावे आपले म्हणावे

आसुसलेल्या भावनेना आवरूनरो

रोज एक नव्या रात्रीला झेलावे


संवेदना त्या मनात क्षणिक होत्या

कर्म असे कोणते हे भोग मिळाले

पण जगण्याचा हाच आधार समजून

जळत जावे जळत जावे ही रात्रही सरेल


*सचिन विश्राम कांबळे*



बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

नीज नीज तांन्हुल्या (अंगाई)

 

नीज नीज माझ्या तान्हुल्या
रवीही गेला झोपायला
बघ कश्या चांदण्या बहरल्या
संगे चंद्रही अवतरला
वाटे जणू दीप हा लावला

नीज नीज माझ्या तान्हुल्या
पाखरं ही गेली निजाया घरट्यात
झुडुपात त्या हरणी ही निजल्या

नीज नीज माझ्या तान्हुल्या
झाडे वेली ही झोपल्या
झाडांवर माकडे घेतायत पेंगा
खळखळून वाहणारी नदी घाली पिंगा

नीज नीज माझ्या तान्हुल्या
रात्र ही बघ ती शांत झाली
रातकिड्यांची किरकिर
बघ रे ऐकू कानी आली

नीज नीज माझ्या तान्हुल्या
गाय वासरे गोठ्यात झोपल्या
आई तुझी खूप रे थकली
पाळणा झुलवते तुझा
लागेल नीज तुला चांगली

नीज नीज माझ्या तान्हुल्या
झुलवते रे तुझा पाळणा
नीज का तुझ आज येई ना
घोर मनी काही कळेना

नीज नीज माझ्या तान्हुल्या
नीज नीज माझ्या तान्हुल्या

***सचिन विश्राम कांबळे***


मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

वाचावी ती, तिने जगावं

 भाव ऐसा मनी जोडूनी दोन्ही करा

जागा हो आता श्री हरी पांडूरंग जरा

म्हणी मन असं करावं काही,मिळवावी दाद

जपलेल्या भक्तिन घालावी तूज साद


सोसेल ती किती जपावी ती नाती फार

सासरचा छळ त्यात कधी कधी मिळेही मार

पेटला तो देह अंग लाहीलाही होई सारं

उघड नयन वाचवाया धाव,पडली ती गार


उगा का करशी जीवाचा रे त्राण

फाटले जे मन निघाला तो प्राण

कपाळकरंटा,कधी वांझ,कधी कुलटा बोलावं

नको हा स्त्री जन्म देवा,तिस असं का वाटावं


मनी फार वाटे ऐसा, करावी राखणं

बदलावे सारे विचार ना तुटावे तिचे मन

साद ही तुज देवा प्रकट तू होशी

करुनी बलात्काऱ्यांचा वध मिळावी फाशी


पाहुनी चीर हरण पाठीशी तूची उभा

राखलीस तूच नारीची या लाज

बळ द्यावे तिशी होऊनी दुर्गा

करावी अत्याचारचा वध,नव नारी घडावी आज


पाहता जन्म तोची तिस मारी

कुठे जन्माला असता,नसता ती नारी

घ्यावं तू परत इथे जन्म,करण्यास रक्षा

स्त्रीने जगावं, स्त्री जगावी,वाचावी हिच घाल भिक्षा...


*सचिन विश्राम कांबळे*



असं पण असतं का बालपण

 

असं पण असतं का बालपण

गेलं त्या निखाऱ्या उन्हानं करपून

होतं ते वय राहावं खेळून बागडून

पण कुणा ठाव कुठं गेलं ते हरवून

माय बाप नसता ना मिळे कुणाचे रक्षण

असं पण असतं का बालपण.......


किडी इवल्याश्या त्या पोटाला

नसता अन्न राहू लागे उपाशी

कशी निद्रा येईल त्या जीवास

एक रात्रीसाठी तुटले जे नाते शिताशी

कोण भरविल घास दाखवून आपलेपण

असं पण असतं का बालपण......


चटके बसत भाजून काडती

नसता पायात जोड

शिकण्याची जिद्द ठेऊन मनी

ऊन्हात चालली इवलीशी ती पोर गोड

मायेनं कधी तिचे होईल का पालन

असं पण असतं का बालपण......


जिद्द लागली ती एक त्या मनाला

विद्या घेईल मज आपल्या उराशी

मोठं होता ना होऊ कोणाची दासी

सारं काही असावं स्व हाताशी

संस्कार अंगी होती हीच शिकवणं

असं पण असतं का बालपण......


नको रे देवा देऊ दुःखाची आठवण

मौज मजा सुख दे तु भरभरून

झऱ्याचे गोड पाणी नको टाकू आटवून

नको रे देऊ देवा असे लहानपण

कुणा वाट्यास असं नको यावं बालपण.....


*सचिन विश्राम कांबळे*


रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

मी जवळून पाहिलंय

 

व्यथा कोण जाणेल त्याची
कोण हो जाणेल त्याचे मन
कोण होता तो गलिच्छ
घाणेरडा व्याख्या करतो आपण
खालच्या दर्जाचा,गबाळा म्हणून
का हो संबोधतो त्यास
निःस्वार्थपणे झटतो
ना कसलाच हव्यास
तुम्हा आम्हा सर्वांसाठी
ज्याने संपुर्ण जीवन वाहिलंय.
कचरा उचलणाऱ्यास मी
इतक्या वेदनेतही हसतमुख पाहिलंय...

घाण, कचरा, उकिरड्या जवळुन जाता
येतो आपोआप नाकावर रूमाल
विचार करूनही किळस वाटतो
सांगा कसा उभा राहत असेल तो त्यात
रखरखत्या उन्हात, मुसळधार पावसात
कडाक्याच्या थंडीची पर्वा त्यास झाली नाही
केर कचरा, घाण उचलूनही
सदा आनंदात राही
अभाग जीवनाशी
कुटुंब त्याचं झुजतच राहिलंय.
कचरा उचलणाऱ्यास मी
इतक्या वेदनेतही हसतमुख पाहिलंय...

घाण वास त्याकडून म्हणून
त्याचे बाजुस कोणी उभा ना राही
असे जीवन का जगतोय?
कशाला? अन् कुणा पायी
किड्या मुंगी सारखं जगणं त्याचे हे,
तुम्ही आम्हीं ना कधीच जाणलंय
कचरा उचलणाऱ्यास मी
इतक्या वेदनेतही हसतमुख पाहिलंय....

कचऱ्यातून रोगांचा उगम,
आजाराचे माहेर घर
किती आजारानं त्रस्त तो
सोबत कुटुंबाची ही दोर
आयुष्याचे दर दिवशी
हरवून येतो काही क्षण
पण कुणात नाही हिम्मत
पुढे येऊन करेल त्याचे रक्षण
प्रचंड प्रकाश असुनही आयुष्य त्याचे,
हे अंधारातच राहिलंय.
कचरा उचलणाऱ्यास मी
इतक्या वेदनेतही हसतमुख पाहिलंय....

जीवनाच्या अर्ध्यावरच
मृत्यू त्यास कवटाळतोय
तरी निडर होऊन
तुम्हा आम्हासाठी झटतोय
होता कमवता पैसा आजारातच गेला
दुसऱ्यांचे जीवन सुखमय करून
स्वतः मात्र गरीबच राहिला
मोठ मोठाले आजार जडून
आयुष्य हे त्याचे त्याच्या
हातातच नाही राहिलंय.
कचरा उचलणाऱ्यास मी
इतक्या वेदनेतही हसतमुख पाहिलंय.....

कचरा करणारे आपणच, आणि
म्हणतो त्यास कचरेवाला
घाणेरडा, गलिच्छ काचरेवाला कोण?
हे आधी विचारा स्वतःच्याच मनाला
जीवनाच्या सिनेमात त्याचा शेवट हा,
मध्यंतरातच होताना मी पाहिला
कस जमत असेल हे सगळ त्यास
इतक्या वेदनेतही असं हसतमुख राहायला...
               
  ****

    *सचिन विश्राम कांबळे*


शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

बहिण

मायेची माऊली
प्रेमाची सावली
पाठराखीन म्हणून देवाने
बहिण पाठवली

बालपण तिच्या सोबत
कसं वेगळं असतं
कधी हसत खेळत
कधी रुसवा फुगव्याच असतं

रागाने भांडतेही ती
खोड्या करून हसवते ती
अभिमान तिला बहिण असल्याचा
जीवाला जीव देते ती

क्षणात हसणारी
क्षणात रडणारी
प्रेमानं जवळ करणारी
बहिण असते माया देणारी

मोठी असली की दम देणार
छोटी असली की रुसणार
आईरुपी दुसरी माय
या जगात बहिणी शिवाय नाही भेटणार

बहिण भाव छान गोड अस नातच वेगळं
भाऊ म्हणजे,धीर,रक्षण पूर्ण माहेर
बहिण म्हणजे प्रेम,माया,छाया,ढाल
सगळं एकवटून मिळालेला गोड आहेर...

*सचिन विश्राम कांबळे*

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

फक्त तुमचं प्रेम हवं

घरात खूप एकटे एकटे वाटते

ना कुणाचं प्रेम ना कुणाच लाड

नको मोबाईल नको टीव्ही

नको खेळणी नको खाऊ

बसुन असं किती किती राहू

बसूनच आई बाबा सोबतचे चित्र रंगवले

आई बाबा माझे कुठे तरी हरवले


बेभान वाऱ्या सारखे सुटावे

बेधुंद निसर्गात रमावे

फुलांना पहावे झाडा वेलींना पाहावे

पावसात चिंब भिजावे खेळावे बागडवे 

पण.... सोबत आई बाबा असावे

त्यांना कधी सोबत राहवे नाही वाटले 

लाडणी कधी त्यांनी नाही भरवले

आईबाबा माझे कुठे तरी हरवले



कामात एवढे झाले व्यस्त हे भानच नाही

कोणी घरी आपली वाट बघतोय

कोणी आपली आठवण काढतोय

कोणीतरी आपल्या प्रेमात रडतोय

असे त्यांना कधीच नाही जाणवले

आई बाबा माझे कुठे तरी हरवले


त्यांनी माझ्या बरोबर खेळावं

त्यांनी माझ्या बरोबर फिरावं

मायेनं जवळ घेऊन गोंजाराव

लाडाने जवळ घ्यावं असं कधी नाही वाटलं

आठवून आठवून डोळे ते अश्रूंनी भरले

आई बाबा माझे कुठे तरी हरवले


एकटं असं जगणं नको वाटतं

प्रेमा शिवाय त्याच्या,जीवन नको वाटतं

शाळा सोडून उनाड भटकू वाटतं

अहंकारात,मिजास करत जगावं वाटतं

विचारांनी या खूप खूप रडवले

आईबाबा माझे कुठे तरी हरवले


नको पैसा,कशाला चिंता भविष्याची

गरज आहे  ती फक्त त्यांचीच

त्यांच्या आपुलकीची,लाडाची,काळजीची

वाट पाहतो त्या मातृत्वेने भरलेल्या त्यांच्या प्रेमाची

मनात वेदना हुंदक्यानी ते भरले

आई बाबा माझे कुठे तरी हरवले


कळेल का कधी दशा माझी

कळेल का कधी व्यथा माझी

किती झुरतो मनातून

किती प्रेम करतो मनातून

कधी का त्यांचं प्रेम मला मिळेल?

न सांगता मी ,कधी प्रेम माझं त्यांना कळेल..



*सचिन विश्राम कांबळे*


रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

तरबेज असला तरी

 

काट्या कुट्याच्या रस्त्याने तु जाऊ नकोस,
वळसा पडला तरी सत्याची वाट तु सोडु नकोस,
कळस नको आधी पाया तु रच,
कितीही तरबेज असला तरी आखूड मार्ग निवडू नको

      पाप कर्म तु करु नकोस,
      चोरी लबाडी तु करु नकोस,
      मेहनतीचा घास मिळवुनी खा तो तु सुखाने,
      कितीही तरबेज असला तरी अपराधाकडे वळू नको

व्यसन तु करु नकोस,
पैसा तु उधळु नकोस,
संसाराची वाट तु लाऊ नकोस,
किती तरबेज असला तरी वाईट संगत करू नको

      अंधश्रधेत तु राहु नकोस,
      कोंबड्या ,बकरा यांचा बळी तु देऊ नकोस,
      भामट्या फसव्या बुवांच्या नादी तु लागु नकोस,
      किती तरबेज असला कर्मकांडात फसू नको

गर्व कसलाच तु करु नकोस,
आपल्याहुन लहानास कमी तु लेखु नकोस,
श्रीमंतीचा आस धरुन वाईट कर्म तु करु नकोस,
किती तरबेज असला तरी अहंकार तू बाळगू नको

      पैसा, श्रीमंती आली जरी,त्याचे तु जतन कर,
      मित्रमंडळी,नातेवाईक,गरीबांस तु मदत कर,
      कुणा पडलेल्यास तु सावर,कुर्कम करणा-यासआवर,
      किती तरबेज असला तरी उन्मत्तपणा दाखवू नको

तुझ्यापेक्षा लहानांनच्या विचारांना तु वाव दे,
लहान जरी असेल,त्यांचे तु मत घे,
सुखाच्या अवकाशात एकटा तुच विहार करु नकोस
किती तरबेज असला तरी  फुशारक्या तू मारू नको

आखूड मार्गाने अनुभव मिळणार नाही
अपराध कडे वळशिल तर तुरुंगवास भोगशील
वाईट संगती करशील तर आयुष्य उद्ध्वस्त करशील
कर्मकांडात फसशील निष्पाप कुणाचा बळी घेशील
अहंकार करून जगशील जमिनीवर पडशील
कितीही तरबेज असशील तरी शिक्षे पासून कसा वाचशील

            
                                   ** सचिन विश्राम कांबळे **


शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

हरीण च पाडस

 

हरीणच पाडस
कूठे तरी हरवलं
कावरी बावरी हरीण
कुठे कुठे नाही शोधलं

कासावीस झाला जीव
व्याकुळतेने विव्हळलं
जंगलभर धावली
पण कुठेच नाही सापडलं

भक्ष नसेल ना झालं
चिंतेत साफ गळून गेलं
डोळ्या अश्रू वाहत
प्रत्येक प्राण्यास विचारलं

एक अस्वल पुढे आलं
धीर त्याने तिला दिला
सापडलं लेकरू तुझं
आशेचा दीप पेटविला

पहाट झाली किलबिलाट झाली
पाडस तिचे परतले
पाहून त्यास धावत सुटली
जवळ घेऊन आनंदाश्रू निघाले

***सचिन विश्राम कांबळे***


अस्तित्व माझं

 स्त्री...या शब्दा पुरतीच

मर्यादित मी राहिले

स्त्री म्हणून जन्मले

हेच का मला नडले


वेदना अपमान सहन करणं

हेच होते माझे जीवन

बिन्धास्त निडर जगणं

कुठे नशीबी.. मेलयं मन


प्रत्येक वेळी मीच नमले

पण हे जग बघून ही आंधळे

मलाच द्यावी लागली अग्नीपरिक्षा

स्त्री जन्म म्हणून का ही शिक्षा


अपेक्षा कोणाकडे करू

कोण घालेल फुंकर या वेदनेला

स्त्रीला समजतात जे फक्त एक वस्तू 

कोण समजावेल या समाजाला


बस झाले आता असह्य हे

कसं मी सहन करत जाणार

कधीतरी उजाडेल नवी पहाट

अस्तित्वासाठी माझ्या आता मी लढत राहणार....


***सचिन विश्राम कांबळे***



शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

आई तुला काय पाहिजे

 

माग आई तुला काय पाहिजे
जे जे आहे माझ्याकडे
अर्पण ते ते तुझ्या चरणात
कळा सोसून जन्म तू दिला मला
नजारा या विश्वाचा तूच दाखविला
जिवापलीकडे सांभाळ केला
संस्कारचा काडा पाजला
शिकविले तूच
तूच घडविले मला
सत्याचा मार्ग दाखवत
घाडवणीचा विडा माझा तूच उचलला
शिकवला खरेपणा शिकवली माणुसकी
कृतज्ञता ,कर्तव्यदक्ष,चांगुलपणाचे दिले धडे
आयुष्य माझे तुझेच देणे
सांग आई तुला काय हवे
उपकार तुझे कैसे फेडू
सेवेचा तुझ्या लाभ दे मला
दुसरे तुझ्याकडचे काही नको मला
इतके दिवस देत आलीस
तेच प्रेम जन्मभर दे मला

*सचिन विश्राम कांबळे*


गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

मी जवळ नसेन

 

कॉफी पिऊन झोप
मग जागा राहशील
वाटलंच होतं तू मला
असच काहीतरी बोलशील

पण कॉफी पिऊन नाही
ते आठवून आहे जागा
फाटक्या नशीबाचा मी
तुझ्या मनात माझी आहे कुठे जागा

पैसे नाही म्हणत असतानाही
कॉफी शॉप मध्ये मला नेलं
फाटका किसा माझा तरी
बिल माझ्या हातात थोपवलं

त्याची लाज नाही वाटली मला
वाईट वाटलं माझं हसू केलं
आईच्या औषधाच्या पैसे देऊन
तूझ्या अहंकारच बिल भरलं

प्रेम केलं ग मी तुझ्याशी
मला मी तुझ्यात होतं शोधलं
फक्त गरीबी दिसली माझी
पण माझं प्रेम नाही कळलं

आज मी तुझ्या प्रेमात
इथे तडफडत जरी असेन
उद्या तू माझ्या साठी तडफडशील
पण कदाचित मी जवळ नसेन...


मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

प्रेम कळले

 

ते
अश्रू
डोळ्यात
जे लपले
नकळत ते
तिलाही कळले
मन अस्वस्थ
तिचे झाले
कळले
प्रेम
हे


पळ काढला

 

कोणाला काय सांगितलं होतं
काय कळलंच नव्हते
एकच ग्लास म्हणत म्हणत
अगदी दोन चार अधिक झाले
पण कमी मुळीच नव्हते

मग काय राव सगळीच धांदल
घरच्या ऐवजी सासरवडीत पोहचलो
वाह..!किती छान झालं
आज मनसोक्त बोलावं म्हटलं
तोच तिला बघून समोर लागलीच दचकलो

अरे व्वा सासरे बुवा सासू बाई
घरी आले वाटतं
तेवढ्यात बायको म्हणाली
ते घरी नाय मी महेरात आली

दोन मिनिटं स्तब्ध तसाच
थोडी कदाचित उतरलीच
एवढ्या डेंजर बायकोला
आता बरं कस काय आवरायचं

मोठा प्रश्न...मोठा प्रश्न
काय सांगावं ......काय सांगावं
नाहीतर काढलं की हो लाटणं

कसं बसं सगळं बळ एकवटलं
आणि दाबात बोललो तिला
इथ काय आहे तुझं माहेराला
यायचं नाय का तुला घरला

तोच बायकोन पदर खोचला
लागली भांडायला
आता राव काय खरं नाय
कसं बसं सावरलं आणि तिथून पळ काढला...

**सचिन विश्राम कांबळे**


आसवं वाहू लागली

 

पहाट होता पिलांना सोडून
ती घरट्या बाहेर निघाली
मनाला घोर तिच्या लागे
पोरं माझी एकटीच पडली

हाजर शंकांचे वादळ घेऊन मनात
अन्न शोधात निघाली माऊली
जावे वाटे ना तिला सोडून असे
पण परत येनीची वेळ सांगून निघाली

मनात भितेचे वारे वाहतात
काळजात आस त्यांच्या सलामातीची
हुरहूर मनाला तिच्या लागे
काळजी अचानक येणाऱ्या वादळाची

काही अघटीत न घडावे
ना कोणी राक्षस न वादळ यावे
अश्रू तिच्या डोळ्यात भरले
पिल्ले माझी सुखरूप राहावे
 
सांजवेळ जवळ जवळ आली
आईची परतण्याची वेळ झाली
पिल्ल घरट्यात उत्सुकतेने
वाटे कडे डोळे लाऊन बसली

किलबिल पूर्ण शांत झाली
तरी आई कुठे ना दिसली
आई घरट्यात कशी नाही आली
डोळ्यातून पिल्लांच्या असावं निघाली

आई बरोबर काही वाईट घडलं
भिजल्या डोळ्यांनी आशा सोडली
चिव चिव ऐकू कानी आली
आईला बघून पिल्ल सुखावली

अन्न साठी चिवचिवाट नाही केली
आईच्या कुशीत जाऊन शिरली
पिल्लांना सुखरूप पाहून
डोळ्यातून तिच्या आसवं वाहू लागली...

***सचिन विश्राम कांबळे***


सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

प्रेम वेडी

 

रोज मला टवकारून बघते
मी पाहिला की गालातल्या गालात हसते
ती का अशी करते काही कळत नव्हतं
नव्हतं समजतActually पाणी कुठे मुरते

अचानक आली समोर आणि
माझी चांगलीच तारांबळ उडाली
अंग थरथरले पोटात आले गोळे तोच
मी तुझ्यावर प्रेम करते म्हणाली

अपेक्षा माझ्याकडून तिला प्रेमाची
पण मन माझं साफ आहे
कसं समजावू त्या प्रेम वेडीला
की मी दोन मुलांचा बाप आहे

आता काय सांगावं कळत नव्हतं
हातात लाटणं घेऊन दुर्गा रूप दिसलं
पूर्ता जागा झालो म्हणालो
नाय जमायचं लग्न आहे माझं झालं

तरी म्हणाली चालेल नो प्रॉब्लेम
अग बाई तुझा नो प्रोब्लेम असेल
दारात उभी दिसतेय मला ती
डोक्यावरच माझ्या एकही केस नसेल
 
त्यामुळे बाई तू कर मला माफ
कारण खरचं मी मनांने आहे साफ

***सचिन विश्राम कांबळे***


मी शेतकरी

 

प्रयत्न माझा नेहमी प्रामाणिक
कष्ट करून या मातीत घाम गाळतो
सोनं नाही तर चांदी तरी पिकावं
दिवस रात्र या मातीत झिजत असतो

हाव नाही कसली ना जादाची
मिळेल त्यात मानतो रे समाधान
देवाकडे एकच साकडे घालतो
घामानं पेरलेलं उगवावं रे धान

राब राब राबून शेतात
सर्वां साठी अन्न पुरवत असतो
दुसऱ्या अन्न पुरवून स्वतःमात्र
कधी कधी उपासमारी सोसतो

फाटक्या नशिबाचा कसा मी
फक्त आयुष्यात प्रयत्नच करतो
स्वतः कापूस पिकवून
अंगावर मात्र फाटकं कापडच घालतो

वर्षभर सुखाच्या आशेत
ऊन पाऊस थंडी वारा हे भान नसतं
पिकवले जरी धान्य.... ते विकून
जिरलेल्या घामाचं चीझ कुठे होतं

नसेल खिशात पैसा तरी
नाहेमी खुश व समाधानी असतो
प्रामाणिक पणाने परत कामाला लागून
तुमच्यासाठी पुन्हा  प्रयत्न करतो
तुमच्यासाठी पुन्हा  प्रयत्न करतो....

**सचिन विश्राम कांबळे**


रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

बाबा

 

खडतर प्रवास जीवनाचा
त्यात अपेक्षा या लाटांचा मार
कधी हृदयावर आदळतात
तर कधी मनावर होतो वार

त्यात माझा बाब भरडला जातो
पण आम्हाला शिकवून मोठं करण्याचा
निर्धार त्याने केलेला असतो

चपला झिजल्या त्याच्या
या खडतर प्रवासात चालून पण उफ नाही केलं
डोक्यावर बर्फ ठेऊन निघाला
चालत राहिला समजून पायाखाली फुलं

निर्धार एवढाच आहे जीवनात केला
त्या झिजनाऱ्या पायाखाली
सुखा चा गालिचा अंथरायचा आहे मला
नशिबाची भोकं बुजवून
भविष्यात आधार द्यायचाय त्याला

खूप सोसलं खूप भोगलं त्यानं
आतून पोकळ वासा तो झाला
वादळ आलं तरी घराचं भार
त्यानं न डगमगता रे पेलवला

दुःख त्याचं त्यांनी कधी नाही दाखवलं
पान चागळाव तस् दुःख चगळुन
चोथ्याचा ही ठाव ठिकाण लागू नाही दिलं

आज तो हाय म्हणून हाय शान
नाहीतर असतं आयुष्य पेटलेलं रान

चार भिंतीचा भरगच्च तो खांब
बाबा तू बस कर... आता तरी थांब

तुझ्या अपेक्षा करणार मी पूर्ण
सुखाचे औषध देऊन
घालवणार ते दुःखाचे अजीर्ण
नको टेन्शन आता मी आहे तू कर आराम
खूप केलंस बाबा तुला खरंच शतशः प्रणाम

***सचिन विश्राम कांबळे***


शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

ती पहिली भेट

 

ती वेळ किती छान होती
आठवणीत ती रुजलेली
किती गोड आनंद देऊन
मनात घर करून राहिलेली

तिची माझी ती पहिली भेट
आठवली की क्षणभर न विलंब
अलगद हृदयाला स्पर्शून जाते
मनात एक हलकं गोड हास्य उमटते
परत ती जवळ आल्याचे भासते
होते त्या स्पर्शाची परत अनूभुती
काय वेळ किती छान होती ती

उभी समोर ती, लाजेत नजर पडलेली
माझ्यातही कंपाची वर्दळ सुरू झाली
थरथरत्या हाताने
तिचा हातात हात घेतला
जवळ ओढताच दोघांचा श्वास थांबला
ते क्षण तसेच टीपावे
तिथेच थांबावे,मनात आनंद देणारे
सरकुच नये असं वाटत होतं
ती लाजत होती चेहऱ्यावरील
लाटागत बटा बाजुला करत होती
काय वेळ किती छान होती ती

नजरा नजर भिडली
हृदयाची धडधड वाढली
इतकी जवळ ती
मनातली चलबिचल थांबली
बेभान होऊन प्रेम करावं
तिच्या सोबतच आयुष्य काढावं
अतूट नात दोघांत व्हावं
अशा असंख्य प्रश्नोत्तराची चुळबुळ
मनाला उत्साह देत होती
काय वेळ किती छान होती ती

जन्मभर साथ देण्याची
जीवनभर प्रेम करण्याची
एकमेकांना आधार देणारी
सर्व वाचणे देऊन घेऊन
परत भेटीचे आमंत्रण देऊन
अखेर नको असणारा निरोप घेतला
अन् ती सुंदर भेट मावळली होती
काय वेळ किती छान होती ती...

*सचिन विश्राम कांबळे*


खडतर प्रवास

 आजही आठवतो नशिबाचा आसुरी काळ

जो मी आणि ताईने सोबत काढला

अजूनही आठवते आई बाबा नसता

तो प्रत्येक क्षण जो एकत्र जगला..


अजूनही आठवतो खडतर प्रवासातील मिट्ट अंधार

ना कुणाचं प्रेम ना कुणाचा आधार


अजूनही आठवतो तो ओसाड रस्ता

ना आजूबाजूला घरं ना  कुठेच झाड

कोसो मैल दूर घरा पासून असलेली शाळा

रस्त्यात न कसली सावली ना कुठेच आड...


दुपारी जेवणाच्या सुट्टीत भर उन्हात

पोटाची आग विझवायला निघायचो घरी

अजब न्याय त्या विधात्याचा 

चटके डोक्यावरही अन् पाया खाली

काय सोसणार ती उष्मेनी वरघळणारी कात

धुराल्याचा रस्ता आणि कोचं गवतात

चटके पायाला आग मस्तकात


गवतावर धाव भाजता पाय धुरल्यात 

पण त्यावर चालनही कुठे नशिबात

टोचायची कोचं चप्पल नसता पायात

झुडूपाचा पाला तोंडून पाया पुढे टाकायचं 

त्यावर उडी मारत मारत घर गाठायच 


घरात हंडी उघडुन बघता

शिल्लक काहीच अन्न नासायचं 

दोन लोटे पणी पिवून पोठभर

परत धरायचो शाळेची वाट

परत तोच रस्ता तेच ऊन तोच क्रम...

शेवटी होतं दुसऱ्याच्या हातावर पोट

    कधीच नाही विसरणार

    नेहमीच लक्षात राहणार...



*सचिन विश्राम कांबळे*


*कोचं -(गावठी शब्द) सुई सारखी टोचाणारी छोटी वनस्पती जी जमनीच्या अर्धी पोटात आणि अर्धी बाहेर असते...



नियती हरली

निसर्गाचा कोप झाला
वादळासह मोठा पाऊस आला
पावसाचा वेग वाढला
पाण्याने पूर्ण मळा भरला

बघता बघता नदी पात्र भरले
ओसंडून नदी पात्र वाहू लागले
लेकरू तिचे अडकले पलीकडे
तिचे बाळ तिकडे आणि ती इकडे

कासावीस झाला जीव तिचा
प्रयत्न करी वाचविण्याचा
पाणी नदीचे वर चढू लागले
अश्रूंचे तिचे बांध फुटले

हंबरडा फोडला तिने
शक्य नव्हते त्यास वाचविणे
आईचा जीव तो राहवेना
पाऊस काही केल्या थमेना

धैर्य करून तिने मारली उडी
देवाने ही कुठे मारली होती दडी
पाण्याचा झोत तिस आवरेना
पायास जमीन कही लागेना

नियतीने खेळ वेगळा केला
पाण्यात देह तिचा वाहून नेला
प्रयत्न तिचे वाया गेले
मुलास वाचविण्यासाठी प्राण दिले

शेवटी ती एक आई जिद्दीची
तयारी नव्हती कशात ही हरण्याची
ओंडके पकडुन आली किनारी
मिळाली नियतीस कोणी टक्कर देणारी

माय लेकाची गाठ झाली
प्रेमा पुढे ती नियातीही हरली
आई जगतात आहेच वेगळी
ऋणी तिचे आपण आहोत सगळी...

**सचिन विश्राम कांबळे**



इतके दूर का गेलात

 

बाबा तुम्ही इतके
लांब का गेलात
शोधून शोधून थकलो
परत कधी येणार

इतके लांब ते
आहे कुठे मला सांगा
कंटाळा आलाय तुमच्या शिवाय
मग मी ही तिथेच येणार

तुमच्या शिवाय लाड माझे
दुसरे कोण करणार
रडलो जर का मी तर
उचलुन कोण घेणार

इकडे शोधू तिकडे शोधू
काहिच समजत नाय
तुमच्या शिवाय खाऊ
कोणी दुसरं देत नाय

पालक दिवस
शाळेत साजरे होतात
सगळ्यांचे बाबा असतात
पण माझेच बाबा नसतात

आई म्हणते बाबा त्या
आकाशात रहतात
रोज रात्री शोधत असतो
कुठेच नाही दिसतात

त्या ताऱ्या मध्ये बाबा तुझे
आई असेच सांगते
इतक्या जवळचे बाबांना माझ्या
मला दुरूनच पहावे लागते..

*सचिन विश्राम कांबळे*


शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

मी अनाथ का

 

चिमणा चिमणी च ते घर
वाह बघ आहे किती सुंदर
चिमणा आणि दाणा
चिमणी भरवी पिलांना

किती छान ते राहतात
घरट्यात त्या आनंदात
पाहून मनात माझ्या येते
माझेही घरटे असावे इथे

देवा माझं घर कुठे हाय
आई बाबा ही कोण माहित नाय
मीच का असा अनाथ
आईबाबा द्यायचे नव्हते तुझ्या ध्यानात

चिमणीच्या पिलांना बघ
कसे आईबाबांना सांगतात
माझ्या मनाच्या संवेदना
तुला कश्या नाही कळतात

मीच का असं एकटं जगावे
मनातलं माझ्या कोणाला सांगावे
मायेनं जवळ बसवून घास मला
कोणी रे देवा भरवावे

तूच जगाचा कर्ता करविता
तुझ्याकडेच सर्व उत्तरे असतात
मायेचा ओलावा हवा मला
मलाही आईबाबा जवळ हवेसे वाटतात

नाही सहन होत रे आता देवा
त्यांच्या शिवाय कसं जगायचं
वेदना मनाला देवा खूप होतात
त्यांच्या माये वाचून आता नाही राहायचं

*सचिन विश्राम कांबळे*


मुक्त जगायला

 

कर तुला हवं ते मर्जीने
थोडं जगून बघ स्वतःसाठी
किती राब राबणार अशी
झिजणार तू दुसऱ्यासाठी

तू स्वतःच आपली करून घेतली
शून्य किंमत कौडी मोल
कारण गुमाण सारं सोसलं
झेलले झुकून ते कडवे बोल

शिक प्रत्युत्तर करायला
अधिकार तुलाही जगायला
नाही मिळालं घे हिसकावून
दाखव तुझ्यातलं बळ जगाला

चल उठ आता तरी हो जागी
परवानगी तुझीच आहे तुला
दाखव इंगा स्त्री शक्तीचा
मग कोण अडवेल मुक्त जगायला


मार्ग सापडतो

 

आभाळ फाटलं धरतीवर आलं
काळ ओढून स्वतःवर तू असा कसा गेला
लात मारून पाठीवर लेकरांच्या
त्यांना पोरके करुन जो गेला

इतके दिवस मनातच साठवुन
जीव आपला कोंडून होता ठेवला
कुणा जवळ मोकळं न होता
असा स्वतःच कुढत का बसला

एकदा तरी सांगायचं होत मनातलं
कसला होता पेच होता कसला घोर
पाचच वर्षाचा संसार सोडून गेलास
कुणा साथ कशी जागावी ती पोर

कुणा नावाचं लावावं कुंकू
कुणासाठी माळावा गजरा
मंगळसूत्र तिचं तोडून गेलास
कोमेजून गेला तो चेहरा हसरा

स्वतःचा जीव घेण्या आधी
सांगून तरी बघावं होतं थोडं
मुळा सकट उकळून टाकलं
राहिलं ते फक्त तिचं मढ

कसं जगावं कसं काढावं आयुष्य तिनं
स्वत:चा जीव घेऊन कुशाल जो गेला
कोणा दारी वसरी भटकावं तिनं
पाठी मागे नुसता वनवासच सोडला

विचार नाही केला कसलाच
मायबाप,बायको,लेकरांचा
आयुष्य नव्हतं इथेच संपत
वेळ होता ना वाट काढायचा

पळवाट चांगली शोधलीस
असा हतबल होऊन स्वतःला संपवलं
विचार ना कशाचा ना कुणाचाच
विडा घ्यावा त्यागत घरच्यांना मरवलं

घुसमट होत असेल कुणाची
दडपण मनातलं मनात ठेऊ नका
एकच पर्याय नाही यावर पाठी हाल घराचे
मन करा मोकळे कधी कुणी असं करू नका...

*सचिन विश्राम कांबळे*


नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...