मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

प्रेम करून पाहावे

 प्रेम म्हणजे काय? प्रेम काय असते

जेव्हा कळते तेव्हा मात्र 

हातातून वेळ निघून गेलेली असते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते


एकमेकांच्या चुका काढण्यात

वेळ वाया घालवलेला असतो

त्यावर एकमेकांना समजण्याचा

प्रयत्न देखील केलेला नसतो

एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात

प्रेमाचं अस्तित्व कमी झालेले असते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते


अजूनही वाटलं वेळ गेलेली नाही

जरूर प्रयत्न करून पहावे

झालेल्या चुका, गैरसमज

प्रेमानेच बदलून घ्यावे

कमी झालेले प्रेम हे

थोड्याशा तडजोडीने पुन्हा मनात वसते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते


एकच लक्षात असावे

सरलेली वेळ परत येत नाही

भूकाळात परत जाऊन

वावरता येत नाही

कोण चुकीचं,कोण बरोबर

कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ

वादात या आयुष्य आपले

गुरफडून गेलेले असते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते......


समंजसपणा, विचाराची कुवत

यानेच प्रेम टिकत असते

एकमेकांच्या नजरेने पाहत खोलवर

परणामी तुमचेच चित्र दिसते

प्रेमानं विश्व जिंकावं

ही भावना जेव्हा मनात रुजते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक गुणाकार रुपी बरेच काही असते.


***सचिन विश्राम कांबळे***

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

लेक

 

असा कयास बांधून बापाने
थाट पाहिला धाडली लेक सासरी
असेल लेक माझी सुखांत नांदत
सर्व काही न मागता असेल पदरी

पण चंद्र होता झाकोळलेला
मिट्ट काळोख होता तिच्या जीवनी
कलह किती झाला घरी तरी
कधी सासर सोडलं नाही तीनी

प्रयत्न केला आनंदी राहून
क्षणभर का होईना दुःख विसरण्याचा
निर्धार हाच केला... आहे त्यात
समाधान मानून जगण्याचा

लढण्याची जिद्द होती म्हणून
आहे त्या परिस्थितीशी लढली
किती वेदना होत्या मनात
अवस्था मनाची तिच्या ओळखता नाही आली

मळभ हे मनावरचे गेले नाही तरी
नात्याची विण उसवू दिली नाही
उगाच नको वाद वाढायला म्हणून
आईबाबाला सूगावा लागू दिला नाही

सार काही निमूटपणे सोसलं
कारण बापला टेंशन द्यायच नव्हतं
इतकं सहन करून नशिबात
वनवास भोगणंच लिहिलं होतं

**सचिन विश्राम कांबळे**


मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

जाणुन घ्या मनातलं

                  किती पहावी स्वप्न त्यांचे कडून

का त्यांच्या विचारांना करावे वजा

आपली मते,विचार त्यांचेवर लादून

का ठेवता त्यांचेवर अपेक्षांचा बोजा


असतील कदाचित त्यांचीही स्वप्ने

आपले स्वप्न का पूर्ण करून घ्यावे

नसेल जर त्यांना रुची त्या कशात

तरी का त्यात उडी मारण्यास लावावे


तुमच्या अपेक्षांचं ओझ त्यांना वाटतात

बेड्या घालून भोगलेला तुरुंगवास

न करता आलं तुमच्या अपेक्षा स्वप्न पूर्ण

जातात घर सोडून वा घेतात गळफास


नका असं क्रूर वागू त्यांचे सोबत

मित्र बनून जाणून घ्या त्यांची मनं

आवड निवड ठरवू द्यावी त्यांनाच

नका घेऊ हिरावून त्यांचं हे जगणं

***सचिन विश्राम कांबळे***


सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

तूझी वाट पाहते रे

धगधगत्या सुर्यागत

जीवन माझं जळतंय

तुझ्या प्रेमात अडकून

मन माझं तिथेच घुटमळतय


स्वप्नांचे ते सुंदर रूप

का दाखवले तू मला

त्या वळणावर थांबवून

सोडून असा मला  का आला


रोज तुझ्या आठवणीत

दिवस कसे तरी ढकलते

त्या वळणात पुन्हा हरवून

तुझी रोज वाट बघत बसते


इतका कठोर कसा

का माझा अंत पाहतोय

तुजविन इथे अंधारात पडले

मग तू कसा उजेडात जगतोय


स्वप्न ती खूप दाखवून

असा का वेदनेत सोडून गेलास

गुदमरतय मन तडफडतय

का परत अजून नाही आलास


रात्र ती कठोर नव्या आशेत जगते

उजाडेल ती पहाट तुझ्या भेटीची

पुन्हा नैराश्य जकडून टाकतं

दया येत नाही का तुला माझ्या प्रेमाची


रोज त्याच अपेक्षेत उठते

तू कधीतरी पुन्हा येशील

डोळे अश्रू निघतात त्या वाटेकडे बघून

या आशेत तू पुन्हा येशील तिथेच मला भेटशील

तू पुन्हा येशील तिथेच मला भेटशील...


**सचिन विश्राम कांबळे**



रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

जवळचं कोणीच नव्हतं

              सारं काही होतं माझ्याकडे

तुझ्यासाठी सोडून आले

प्रेमात तुझ्या देहभान हरपून

आई बाबा च्या प्रेमालाही ठोकरले


तुझ्यात सार शोधलं जीवनाचं

तुझ्यात गुंतत गेले

हरवले तुझ्या प्रेमात

मन पाखरू होऊन नहाले


आतुरता सतत तुझ्या भेटीची

तुझ्या प्रेमाच्या धुंदीत बावरले

गुंफण असे मनात तुझ्या प्रेमाचे

स्वतः लाही तुझ्या प्रेमात विसरले


तुझ्या सोबतीत ना कसलं दडपण

ना होतं मनावर कसलंच भार

वाटे अलगद विसावं तुझ्या मिठीत

अन् सुटावा तो मंद वारा गार गार


पण हे सारं क्षणिक होत

दिलास काळजावर घाव

प्रेम माझं तुला कधी कळलंच नाही

ना ओळखता आले तुला मनातले भाव


देऊन गेलास त्या आठवणींच भार

कसं जगावं मी तुझ्या विना

प्रेमाचं चांगल फळ दिलं

सहन नाही होत रे आता त्या वेदना


प्रेम नव्हतच मग स्वप्न का दाखवलं

जर असं अर्ध्यावर सोडून जायचं होतं

एकटीच पडले रे मी दुःख कोणाला सांगावं

शेवटी जवळचं अस कोणीच नव्हतं...


*सचिन विश्राम कांबळे*

परत कशी भेटेल

 

चार आजूबाजूची माणसं
तेवढाच आनंद जीवनाचा
गप्पा गोष्टी करायच्या त्यांच्या बरोबर
दिवस कसातरी ढकलायचा

वय झालं आता
काय बोलते काय करते
कोणाला काय बोलावं कसं वागावं
समजत नाही भान हरपून जाते

असंच काय सांगितलं असेल कोणाला
काही आठवत नाही व कळत ही नव्हते
मुलगा सून दोघेही माझ्यावर खेकासाले
घरच्या गोष्टी कशाला बाहेर सांगायच होते

मला ते कळलंच नाही
काय घडलं काय चूक माझ्याकडून झाली
सामान गाठोडं बांधलं माझं
वृद्धाश्रमात रवानगी माझी केली

सुटत नव्हतं घर जे मायेनं बांधलेलं
नातवंडानवरही खूप होता लळा
मुलगा सून नातवंड सोडून जायचं
काळजात येत होत्या कळा

असेल चूक माझी झाली
म्हणून एवढी मोठी शिक्षा दिली
अरे म्हातारी झाली आई तुझी
म्हणून काय बाहेर काढून फेकली

असू दे प्रायश्चित्त माझं हेच
आश्रमात राहून कड सोसेल
तू मात्र सुखी राहा माझ्या बाळा
पण आई एकच असते परत कशी भेटेल..

**सचिन विश्राम कांबळे**


शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

माहेर

 

कसं विसरु ते

आईचं मायेनं वाढवणं

बाबांची काळजी

भावाच्या सोबतीच देणं


कसं विसरु ते

मायेनं नटलेल घर माझं

आईचं गोंजरणं अन्

पोटात सांभाळलेलं ओझं


कसं विसरु ते

माझं रोज रुसण बसणं

आईचं मनवणं

मी बाबांकडे तक्रार करणं


कसं विसरु ते

भावा बरोबर भांडणं

कामाचा कंटाळा करणं

आईनं न बोलता ते सर्व करणं


कसं विसरु ते

बालपणात खेळणं

बागडणं नाचणं हिंडणं

बिन्धास्त मजा करणं


कसं विसरू ते

आपल्या मर्जी च जगणं

ना कामाचा ताण ना चिंता

ना कोणाचं रागावणं


आठवण येते ती

खूप माहेरची मला

लग्न झालं सासरी आले

अन् माहेर परकं झालं मला


आठवणी त्या खूप माझ्या

रात्र दिवस जो तिथेच रंगला

मायेच्या त्या सावली खाली

देह माझा तो वाढला


कसं विसरु हे सारं

गर्व स्त्री जन्माला

आईची माया, बापाचा लळा जिथं

कसं विसरु माहेरघराला....


**सचिन विश्राम कांबळे**


स्वप्न सुंदरी

 

पहिल्याच नजरेनं केली जादू
डगमगले मन होती सौंदर्याने भरलेली मांदू
तिच्या त्या तीक्ष्ण नजरने
घायाळ केले नजरेच्या बाणाने
निळे मादक लोचन तिचे खूप भारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

चेहऱ्यावर तीच्या लाजेचा भाव
ती समोर आपला लागेल का टिकाव
होती ती जणू कोमल कळी
गालावर होती तीच्या पडली खळी
स्मित हास्यी चेहरा तिचा दिसे भारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

केसात माळला होता फुलांचा गजरा
वाटे जणू स्वर्गातली अप्सरा
गालात हसली मनात बसली
शृंगार असा जणू नवरी नटली
मोत्याचा हार तिस शोभे भारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

काळेभोर दाट केस सडपातळ बांधा
तिज पाहून मनी उडे अमाप त्रेधा
नाकात नथ कानात डुल
होते तिचे ते मंजूळ बोल
कपाळी कुंकू लावण्यवती ती नारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

स्वर तिचे मधुर होते अमृतापरी गोड
हरवून गेलो सौंदर्याची नव्हती तोड
तिला पाहून गेलो विसरून भान
होती ती जणू सौंदर्याची खाण
पापण्या लवताच अदृश्य झाली
न जाणो होती कुठून आली
राहील ती माझ्या खोल अंतरी
हीच ती माझी स्वप्न सुंदरी.....
हीच ती माझी स्वप्न सुंदरी.....

*सचिन विश्राम कांबळे*


मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

झुंज तिची जीवनाशी


भुईवरी मारला हातोडा
पदर झुंजण्या खोचला
जगण्याच्या धुंदी साठी
एक एक दाणा पेरला

पाठीवर बांधुनी लेकरास
कंबर कसली लढण्यास
धगधगत्या सूर्या पासून
निघाली सावली शोधण्यास

बळ हेची जगण्याचे तिचे
मनी जिद्द होती अपार
मोडला नाही अजून कणा
सांभाळी कष्टांनी संसार

आशा हीच मनात ठेवुनी
सूख घेईल एकदातरी उराशी
प्रयत्न नाही सोडणार कधी
ना ठेवीन लेकरा कधी उपाशी

***सचिन विश्राम कांबळे***



नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...