शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

स्वप्न सुंदरी

 

पहिल्याच नजरेनं केली जादू
डगमगले मन होती सौंदर्याने भरलेली मांदू
तिच्या त्या तीक्ष्ण नजरने
घायाळ केले नजरेच्या बाणाने
निळे मादक लोचन तिचे खूप भारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

चेहऱ्यावर तीच्या लाजेचा भाव
ती समोर आपला लागेल का टिकाव
होती ती जणू कोमल कळी
गालावर होती तीच्या पडली खळी
स्मित हास्यी चेहरा तिचा दिसे भारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

केसात माळला होता फुलांचा गजरा
वाटे जणू स्वर्गातली अप्सरा
गालात हसली मनात बसली
शृंगार असा जणू नवरी नटली
मोत्याचा हार तिस शोभे भारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

काळेभोर दाट केस सडपातळ बांधा
तिज पाहून मनी उडे अमाप त्रेधा
नाकात नथ कानात डुल
होते तिचे ते मंजूळ बोल
कपाळी कुंकू लावण्यवती ती नारी
वाटे जणू स्वप्नातली अस्मानी परी

स्वर तिचे मधुर होते अमृतापरी गोड
हरवून गेलो सौंदर्याची नव्हती तोड
तिला पाहून गेलो विसरून भान
होती ती जणू सौंदर्याची खाण
पापण्या लवताच अदृश्य झाली
न जाणो होती कुठून आली
राहील ती माझ्या खोल अंतरी
हीच ती माझी स्वप्न सुंदरी.....
हीच ती माझी स्वप्न सुंदरी.....

*सचिन विश्राम कांबळे*


७ टिप्पण्या:

  1. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली.
    खूपच मस्त आहे ही स्वप्नातील परी 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाहह...भारीच की...नक्कीच भेटेल स्वप्नसुंदरी...😅

    छान लीहीलय सचिनदादा...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...