सारं काही होतं माझ्याकडे
तुझ्यासाठी सोडून आले
प्रेमात तुझ्या देहभान हरपून
आई बाबा च्या प्रेमालाही ठोकरले
तुझ्यात सार शोधलं जीवनाचं
तुझ्यात गुंतत गेले
हरवले तुझ्या प्रेमात
मन पाखरू होऊन नहाले
आतुरता सतत तुझ्या भेटीची
तुझ्या प्रेमाच्या धुंदीत बावरले
गुंफण असे मनात तुझ्या प्रेमाचे
स्वतः लाही तुझ्या प्रेमात विसरले
तुझ्या सोबतीत ना कसलं दडपण
ना होतं मनावर कसलंच भार
वाटे अलगद विसावं तुझ्या मिठीत
अन् सुटावा तो मंद वारा गार गार
पण हे सारं क्षणिक होत
दिलास काळजावर घाव
प्रेम माझं तुला कधी कळलंच नाही
ना ओळखता आले तुला मनातले भाव
देऊन गेलास त्या आठवणींच भार
कसं जगावं मी तुझ्या विना
प्रेमाचं चांगल फळ दिलं
सहन नाही होत रे आता त्या वेदना
प्रेम नव्हतच मग स्वप्न का दाखवलं
जर असं अर्ध्यावर सोडून जायचं होतं
एकटीच पडले रे मी दुःख कोणाला सांगावं
शेवटी जवळचं अस कोणीच नव्हतं...
*सचिन विश्राम कांबळे*
सुंदरच.....
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना ✍️✍️👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा