जन्मा आधीच मनात भीती
जन्म माझा होईल काय
मुलगा असणे हट्टा पायी
माझा बळी घेतला जाईल काय
वयात येता काहूर मनात भीतीचे
जाता येता कोणी छेड काढेल काय
प्रेम नसता एकतर्फी प्रेमातून
माझ्याबरोबर काही वेगळं घडेल काय
प्रेम केलं तरी मनात भीती
प्रेम भावना बाजूलाच राहील काय
भोळेपणाचा फायदा घेऊन
मला कोणी प्रेमात फसवेल काय
लग्न झालं तरी भीती मनात ती
सासरी कोणी समजून घेईल काय
तिथल्या रीती रूढी समजून
त्यांची मने जिंकता येईल काय
म्हातारपणी ही भीती मनात ती
पोटचा गोळा माझा सांभाळ करेल काय
ओझ या म्हातरीचं म्हणून
वृद्धाश्रमात मला धाडेल काय
आयुष्य माझे असं भितीत गेलं
वावरले मी या भितीच्याच जगात
बाहेर,घरी,शाळा कॉलेजात
भीतीला जवळ करावं कधीच नव्हतं मनात
***सचिन विश्राम कांबळे***
व्वाऽ सच्चू...!!
उत्तर द्याहटवामस्तच अप्रतिम रचना...!👌
💐🍧💐🍧💐🍧💐🍧💐🍧
आबा 🙏
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाकटु वास्तवदर्शी रचना.. अप्रतीम...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवावाह अतिशय सुंदर रचना ....खूप खूप छान ✍️✍️✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी रचना खूप छान✍️✍️👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा