नीज नीज माझ्या तान्हुल्या
रवीही गेला झोपायला
बघ कश्या चांदण्या बहरल्या
संगे चंद्रही अवतरला
वाटे जणू दीप हा लावला
नीज नीज माझ्या तान्हुल्या
पाखरं ही गेली निजाया घरट्यात
झुडुपात त्या हरणी ही निजल्या
नीज नीज माझ्या तान्हुल्या
झाडे वेली ही झोपल्या
झाडांवर माकडे घेतायत पेंगा
खळखळून वाहणारी नदी घाली पिंगा
नीज नीज माझ्या तान्हुल्या
रात्र ही बघ ती शांत झाली
रातकिड्यांची किरकिर
बघ रे ऐकू कानी आली
नीज नीज माझ्या तान्हुल्या
गाय वासरे गोठ्यात झोपल्या
आई तुझी खूप रे थकली
पाळणा झुलवते तुझा
लागेल नीज तुला चांगली
नीज नीज माझ्या तान्हुल्या
झुलवते रे तुझा पाळणा
नीज का तुझ आज येई ना
घोर मनी काही कळेना
नीज नीज माझ्या तान्हुल्या
नीज नीज माझ्या तान्हुल्या
***सचिन विश्राम कांबळे***
वाह सचिन तुला अंगाई गीत खूप छान लिहिता येत
उत्तर द्याहटवामस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच सुंदर रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहहह... खुप सुंदर अंगाई...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच अतिशय सुंदर अंगाई गीत 👌👌👌🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअंगाई गीत... सुंदर रचना!✍️������
उत्तर द्याहटवासुंदर च रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर अंगाई गीत ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाखूप छान अंगाई गीत
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा