दुःख माझे काय सांगू कोणाला
वेदना जळतायत खोल मनात
रोजच असं मरण होतंय
असं जगणं माझ्याच का नशिबात
रोज रात्री एक अनोळखी चेहरा
ना कोणा मध्ये दयेचा भाव ना प्रेम मनात
कोणी वासनेने भुकेलेला
तर कोणी बेधुंद झालेला व्यसनात
रोज नवीन नवीन भोगी नशिबी
कोणाला ना कळे माझ्या मनाची संवेदना
पोटासाठी मरते करावे लागते
मन जळतंय कश्या थांबवू वेदना
रोज मनात सप्न निघते घेऊन
रात्र काढते जळत्या निखाऱ्या वानी
नवा दिवस उजाडेल नशिबाचा माझ्या
आशेत या होईल कोणाची राणी
कुठे भाग्य ते माझे असे
कोणी प्रेम करावे आपले म्हणावे
आसुसलेल्या भावनेना आवरूनरो
रोज एक नव्या रात्रीला झेलावे
संवेदना त्या मनात क्षणिक होत्या
कर्म असे कोणते हे भोग मिळाले
पण जगण्याचा हाच आधार समजून
जळत जावे जळत जावे ही रात्रही सरेल
*सचिन विश्राम कांबळे*
वाह सचिन तू ज्वलंत विषयावर फारच
उत्तर द्याहटवाछान लिहलस 🙏🏻🙏🏻 अबीनंदन 💐💐
अभिनंदन असे वाचावे 🙏🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर , भावस्पर्शी रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाभावनास्पर्शी रचना केलीत
उत्तर द्याहटवाखूप छान विषयावर लिखाण केलं खूप सुंदर रचना केली
उत्तर द्याहटवासुंदर काव्यरचना!��✍️������
उत्तर द्याहटवाखूपच भावस्पर्शी रचना केली दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवावास्तविक लिहले सचिन
उत्तर द्याहटवानिःशब्द 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंयस 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप सुंदर अप्रतीम रचना, सुरेख शब्दांकन , वेगळा व ज्वलंंत विषय छान मांडला आहे....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवावाहहह...खुप सुंदर लिहीलय... प्रेरणादायक...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाKhupch sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवाखरंच
उत्तर द्याहटवाखूप छान अप्रतिम लिखाण 👌
आबा..!
🙏