गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

कोणी प्रेम करावे

दुःख माझे काय सांगू कोणाला

वेदना जळतायत खोल मनात

रोजच असं मरण होतंय

असं जगणं माझ्याच का नशिबात


रोज रात्री एक अनोळखी चेहरा

ना कोणा मध्ये दयेचा भाव ना प्रेम मनात

कोणी वासनेने भुकेलेला

तर कोणी बेधुंद झालेला व्यसनात


रोज नवीन नवीन भोगी नशिबी

कोणाला ना कळे माझ्या मनाची संवेदना

पोटासाठी मरते करावे लागते

मन जळतंय कश्या थांबवू वेदना


रोज मनात सप्न निघते घेऊन

रात्र काढते जळत्या निखाऱ्या वानी

नवा दिवस उजाडेल नशिबाचा माझ्या

आशेत या होईल कोणाची राणी


कुठे भाग्य ते माझे असे

कोणी प्रेम करावे आपले म्हणावे

आसुसलेल्या भावनेना आवरूनरो

रोज एक नव्या रात्रीला झेलावे


संवेदना त्या मनात क्षणिक होत्या

कर्म असे कोणते हे भोग मिळाले

पण जगण्याचा हाच आधार समजून

जळत जावे जळत जावे ही रात्रही सरेल


*सचिन विश्राम कांबळे*



१५ टिप्पण्या:

  1. वाह सचिन तू ज्वलंत विषयावर फारच
    छान लिहलस 🙏🏻🙏🏻 अबीनंदन 💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर , भावस्पर्शी रचना 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान विषयावर लिखाण केलं खूप सुंदर रचना केली

    उत्तर द्याहटवा
  4. खुप सुंदर अप्रतीम रचना, सुरेख शब्दांकन , वेगळा व ज्वलंंत विषय छान मांडला आहे....👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...