ये माऊली धरणी माता
चरणी ठेवितो माथा
कष्ट करतो अमाप
तरी मनी भय अपयशाचे
गाळला घाम येथे
फळ मिळेल का कष्टाचे
मेघ राजा बरसला
आनंद जीवनी आला
केली ती नगरणी पेरणी
तरी मनी भय अपयशाचे
पिकेल का रे धान्य
यश मिळेल का प्रयत्नाचे
मोठे ते शेत झाले
पिक पिकाया लागले
झाली वेळ कापणीची
तरी मनी भय अपयशाचे
थैमान अवकाळी पाऊस घालून
घरा धान्य येईल का मेहनतीचे
शेतमाल बाजार भरला
माल विकाया घेऊन आला
उत्पन्न मिळेल काही त्यातून
तरी मनी भय अपयशाचे
बाजार भाव तो पडून
कौडी मोलाने ते जयायचे
तरी प्रयत्न नाही सोडे
पुन्हा उठून कामा लागे
यंदा ना उत्पन्नपुढल्या वर्षी मिळेल
आस हीच ठेऊन आशेत जगे
***सचिन विश्राम कांबळे***
खूप सुंदर रचना.शेतकऱ्याची व्यथा सुंदर शब्दात मांडली आहे...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखूप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवा