सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

तूझी वाट पाहते रे

धगधगत्या सुर्यागत

जीवन माझं जळतंय

तुझ्या प्रेमात अडकून

मन माझं तिथेच घुटमळतय


स्वप्नांचे ते सुंदर रूप

का दाखवले तू मला

त्या वळणावर थांबवून

सोडून असा मला  का आला


रोज तुझ्या आठवणीत

दिवस कसे तरी ढकलते

त्या वळणात पुन्हा हरवून

तुझी रोज वाट बघत बसते


इतका कठोर कसा

का माझा अंत पाहतोय

तुजविन इथे अंधारात पडले

मग तू कसा उजेडात जगतोय


स्वप्न ती खूप दाखवून

असा का वेदनेत सोडून गेलास

गुदमरतय मन तडफडतय

का परत अजून नाही आलास


रात्र ती कठोर नव्या आशेत जगते

उजाडेल ती पहाट तुझ्या भेटीची

पुन्हा नैराश्य जकडून टाकतं

दया येत नाही का तुला माझ्या प्रेमाची


रोज त्याच अपेक्षेत उठते

तू कधीतरी पुन्हा येशील

डोळे अश्रू निघतात त्या वाटेकडे बघून

या आशेत तू पुन्हा येशील तिथेच मला भेटशील

तू पुन्हा येशील तिथेच मला भेटशील...


**सचिन विश्राम कांबळे**



५ टिप्पण्या:

  1. वाहह..प्रेयसीची प्रियकराला आर्त साद...सुरेख शब्दांत मांडली आहे... अप्रतीम...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...