धगधगत्या सुर्यागत
जीवन माझं जळतंय
तुझ्या प्रेमात अडकून
मन माझं तिथेच घुटमळतय
स्वप्नांचे ते सुंदर रूप
का दाखवले तू मला
त्या वळणावर थांबवून
सोडून असा मला का आला
रोज तुझ्या आठवणीत
दिवस कसे तरी ढकलते
त्या वळणात पुन्हा हरवून
तुझी रोज वाट बघत बसते
इतका कठोर कसा
का माझा अंत पाहतोय
तुजविन इथे अंधारात पडले
मग तू कसा उजेडात जगतोय
स्वप्न ती खूप दाखवून
असा का वेदनेत सोडून गेलास
गुदमरतय मन तडफडतय
का परत अजून नाही आलास
रात्र ती कठोर नव्या आशेत जगते
उजाडेल ती पहाट तुझ्या भेटीची
पुन्हा नैराश्य जकडून टाकतं
दया येत नाही का तुला माझ्या प्रेमाची
रोज त्याच अपेक्षेत उठते
तू कधीतरी पुन्हा येशील
डोळे अश्रू निघतात त्या वाटेकडे बघून
या आशेत तू पुन्हा येशील तिथेच मला भेटशील
तू पुन्हा येशील तिथेच मला भेटशील...
**सचिन विश्राम कांबळे**
मस्तच... अप्रतिम शब्द रचना...👌👍✍️🍫🧁
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह..प्रेयसीची प्रियकराला आर्त साद...सुरेख शब्दांत मांडली आहे... अप्रतीम...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाKhup chan lihilay apratim rachna keli ...
उत्तर द्याहटवाVirh kay asto kiti trasdayk asto .khup chan lihilay