मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

झुंज तिची जीवनाशी


भुईवरी मारला हातोडा
पदर झुंजण्या खोचला
जगण्याच्या धुंदी साठी
एक एक दाणा पेरला

पाठीवर बांधुनी लेकरास
कंबर कसली लढण्यास
धगधगत्या सूर्या पासून
निघाली सावली शोधण्यास

बळ हेची जगण्याचे तिचे
मनी जिद्द होती अपार
मोडला नाही अजून कणा
सांभाळी कष्टांनी संसार

आशा हीच मनात ठेवुनी
सूख घेईल एकदातरी उराशी
प्रयत्न नाही सोडणार कधी
ना ठेवीन लेकरा कधी उपाशी

***सचिन विश्राम कांबळे***



१० टिप्पण्या:

  1. वाहह... खुप सुंदर , प्रेरणादायक रचना..सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली ...

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...