भुईवरी मारला हातोडा
पदर झुंजण्या खोचला
जगण्याच्या धुंदी साठी
एक एक दाणा पेरला
पाठीवर बांधुनी लेकरास
कंबर कसली लढण्यास
धगधगत्या सूर्या पासून
निघाली सावली शोधण्यास
बळ हेची जगण्याचे तिचे
मनी जिद्द होती अपार
मोडला नाही अजून कणा
सांभाळी कष्टांनी संसार
आशा हीच मनात ठेवुनी
सूख घेईल एकदातरी उराशी
प्रयत्न नाही सोडणार कधी
ना ठेवीन लेकरा कधी उपाशी
***सचिन विश्राम कांबळे***
खुपच सुंदर रचना.... 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह... खुप सुंदर , प्रेरणादायक रचना..सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली ...
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना सचिन...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाफारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान 👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना✍️✍️👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा