आयुष्यभर काबाड कष्ट करून
आयुष्य हे असंच संपतं
हिशोब मांडून गणती करून
नाती जपून जपून दमतं
शेवटी बायको म्हणते
असं वेगळं काय करता
कर्तव्य तुमचं च हाय
म्हणुन तर आम्हाला पोसता
मुलं सुद्धा असच म्हणतात
काय केलंय आमच्यासाठी
रात्र दिवस देह झिजवला
कमावलं हे सर मग कोणासाठी
गणती करून करून
कोणाला काय हिशोब दाखवणार
डोळे बंद करून दूध पिनाऱ्याला
बाहेरचं जग काय दिसणार
प्रेम कमवा, माणुसकी कमवा
कोणाला न दुखावता जगा
मरणा नंतर हेच आठवणारवि
वीनत राहा नात्याचा एक एक धागा
धन संपत्ती पैसा काय आहे
आणि हे कोण बघणार
तुमचं असं इथे काहीच नाही
शेवटी सारं काही इथेच आहे सुटणार
किती काय कमावलं
आता कशाला बघायचं
आयुष्य हे एकदाच मिळतं
मस्त हसत खेळत मजेत जगायचं...
**सचिन विश्राम कांबळे**
खूप छान लिहितोस सचिन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर आहे
उत्तर द्याहटवाछानच लिहीलयस 👌👌
गणेश दळवी 🙏🏼
अप्रतिम सुंदर सचिन
उत्तर द्याहटवासचिन... सुंदर काव्यलेखन!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर शब्द रचना अप्रतिम केली आहे.
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवा