स्वतःच इथे अस काय असतं
रिकाम्या ओंजळ आले असतो
खाली हातच जावं लागतं
जीवनाचं हे चक्र असच असतं
काय कमावलं ते इथेच राहणार
हक्क गाजवत का मिरवायच
जीव असे तोवर तुमचंच असतं
मेल्यावर काय थोडी घेऊन जाणार
कोणती गोष्ट स्वतःची अशी कशी म्हणणार
धन, दौलत,संपत्ती,पैसा, नाती
हयात असेल जोवर तुमचे असतील
मरणा नंतर हे सारं इथेच सुटणार
चांगले कर्म,चांगले गुण,चांगली वाणी हेच तुमचं
कायम राहतील नाही कुठेच दडणार
आयुष्यभर हेच लक्षात राहतील त्यांच्या
जे तुमच्या सरणावर रडणार....
*सचिन विश्राम कांबळे*
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली वास्तविकता मांडली 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वाव...सुदर लिहंलय !👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खुप सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा