बाजूची सरू बोलतेय असा
आला तिचा फोन मला
कधी कुठे कसा भेटशील
भेटून काहीतरी सांगायचंय तुला
शहारले अंग मनात गुदगुल्या
असंख्य प्रश्नांचे कोडे मनाला
चलबिचल सुरू झाली मनात
पहिलीच वेळ कोणा मुलीचा फोन मला
रात्र विचारात संपतच नव्हती
दुरूनच पहायचो जिला
स्वप्नात येणारी सत्यात अवतरली
उद्या प्रतेक्षात भेटणार मी तिला
कशी तरी रात्र संपली
सकाळी लवकर उठून तयारी केली
नऊ वाजता भेटायचं ठरलं होतं
जीवाची मात्र घालमेल झाली
कोणते कपडे घालायचा प्रश्न...
जीन्स घालू की फॉर्मल घालू
मन कासावीस तिच्या भेटीस
पहिलीच भेट तिची काय गिफ्ट देऊ
बरोबर भेटीच्या वेळेत ती
अन् मी ही हजर झालो
इतक्या जवळ पाहून तिला
एक क्षण मी स्वतःलाच विसरलो
कसं बोलावं पहिलीच वेळ होती
मी काही बोलण्या आधी तिनेच सुरुवात केली
फायनान्स कंपनीत कामाला हीच वेळ ऑफिसची
म्हणून तुला भेटण्यास हीच वेळ निश्चित केली
असंख्य कडकडल्या विजा मनात
बोल लवकर बोल काय सांगायचं तुला
मनाशीच बोललो आता प्रतीक्षा नको
कंठ खोलून प्रपोज करावं का तिला
इतक्यात तीच म्हणाली
लोन घेतलं का रे नोटीस देणार आहेत तुला
बोळात राहतोस माझ्या म्हणून
सांगावसे वाटले तुला
हेच काम होतं म्हणूनच
भेटायला आले तुला
वेदना झाल्या खोल मानाला
रंगवलेल्या त्या स्वप्नांची क्षणात माती झाली
पहिलीच वेळ तीही अशी निसटून गेली
अशी राव चांगलीच फजिती माझी झाली....
*सचिन विश्राम कांबळे*
अतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना!👌👌👌
उत्तर द्याहटवावाह काय मस्त लिहिलंस तू सचिन 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाछानच..👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा भारीच 👌👌👌👌
उत्तर द्याहटवागणेश दळवी 🙏🏼
Ohhh... सुंदर कथानक...🌹👌✍️🍫👍🌹
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर काव्य रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा