घेता थोडी.. थोडी
झाले खंबे दोन
चाललो रस्त्यात
मला अडवेल कोन
दिला आवाज मागून मला
थांबलो विचारलं हम आपके है कौन
खोचून साडी खेकासली मला
बायको तुमची आणि हे नमुने दोन
घरी गेलो अंथरुणात पडलो
डोळा लागताच पडला चोप
राग आला ओरोडलो त्याला
कोण रे तू मोडतोय माझी झोप
विचारताच माझा घेतला रिमांड
बाप हाय तुझा घरचा हायकमांड
बाबा जाताच अंग टाकले
चालून चालून होते पाय दुखले
बघता समोर उभी तिला
न जाणो कसे आले लाड मला
लाडात म्हणालो ये कारभारीन
डोकं फिरलं तुमचं मी तुमची मोलकरीण
डोकं अंग सारं झालं जड
अशी ही झाली माझी परवड
मोलकरणी जाताच बायको आली
वरण भात दे मला भूक लागली
वरण नाही केलंय केलाय फ्राय भात
ऐकताच बाकासुर आला अंगात
पुढ्यात येता ताट
घातला घास तोंडात
बायको ओरडली
अहो! का खाताय माझा हात
झोप उडाली जागा झालो
काय हो येतंय तुमच्या मनात
चावली जीभ भित बायकोला
होतो मी स्वप्नात... होतो मी स्वप्नात....
*सचिन विश्राम कांबळे*
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवावाह.... भारीच 👌👌👌
उत्तर द्याहटवाआजचा दिवस मजेत की हवेत तरंगत 😀😀
कमेंट मजेत घ्यावी... 🙏🏼🙏🏼🙏🏼
फार सुंदर विनोदी कवीता..👌👍💐🍫🤣🤣🤣🤣🤣
उत्तर द्याहटवाव्वाव... भन्नाट रचना!🤔👌🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवावा, खूपच भारी रचना केली सर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वाऽ सच्चू ...!
उत्तर द्याहटवाक्या बात है ....!!👌
अप्रतिम ...!! खूपच छान मस्त काॅमेडी रचना साकाळी सकाळी हसून खूप मजाच आली ...👌👌
आबा 🙏
व्वा भारीच लिहीलयस 👌👌😄😄
उत्तर द्याहटवाफारच सुंदर विनोदी कविता 😊😊😊😊😊😊🍫
उत्तर द्याहटवाखूप मज्जा आली वाचताना👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवा