सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

त्याला मनात जपलं

 

तो मला रोजच पाहत होता
प्रेम दीवाना असावा असं वाटलं
जास्त लक्ष नव्हतंच त्याच्याकडे
सोडून द्यावं दुर्लक्ष करावं म्हटलं

पण रोज मागे मागे यायला लागला
माझा पाठलाग करायला लागला
मी जिथे जिथे जायची
तिथे तिथे माझ्या आधी तोच पोहचायला लागला

हळु हळु तो रोज
माझ्या जवळ यायला लागला
माझ्या क्लासच्या कॉलेज वेळा
सर्व कळायला लागल्या त्याला

मला ही त्याची सवय झाली
त्याची आणि माझी एक वेळ होत गेली
त्याच अस बघणं आवडायला लागलं
आणि मलाच नाही कळलं मी त्याची कधी झाली

मी त्याच्या प्रेमात बावरी झाली
दिवस रात्र त्याच्या विचारात गुंग झाली
त्याला हे माहीतच नसेल
की नकळत मी त्याच्या प्रेमात कशी पडली

अचानक तो कुठे गायब झाला
बहुतेक माझ्याकडून प्रतिसाद नाही म्हणून
कंटाळा आला असावा त्याला
आणि हे सगळं सोडून गेला

पण मी मात्र त्याच्या प्रेमात वेडी
डोळे माझे त्यालाच शोधत राही
खूप शोधले त्याला असे किती दिवस गेले
पण तो परत कधी आलाच नाही

वाटलं ती वेळ परत यावी
त्याची माझी भेट परत व्हावी
त्याला मनातलं तेव्हा सांगून टाकावं
त्याला आपल्या मिठीत घ्यावं

मग कळलं तो निघून गेला
तिथेच प्रेमाचा माझ्या बळी गेला
गेलेली वेळ परत येत नाही
खंत तो मनात तसाच राहिला

आज ही त्याच्या आठवणीत जगते
त्याला माझ्या ह्रुदयात जपला
खरं प्रेम काय असतं कळलं
त्याच्या आठवणीने उर भरला

***सचिन विश्राम कांबळे***


४ टिप्पण्या:

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...