कोण ऐकून घेईल ही व्यथा
थाटला संसार क्षणात तुटला
काय होती चूक अशी झाली
जन्मभरासाठी धरला हात सुटला
अपराध हाच होता का माझा
घेतला जन्म तो गरिबा घरा
पगडी ठेऊनी लाचार बाप माझा
वेदनेने वाही डोळ्या अश्रू धारा
हाव इतकी असे का कुठे कुणा
लाचार ती माणुसकी त्या पुढे झाली
स्वार्था लोभा पायी नातीही हरली
माया शब्दाची नुसती,तीही पैशात तोलली
***सचिन विश्राम कांबळे***
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना आणि अप्रतिम व्यथा मांडली 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान.....👌👍✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाउत्तम काव्यलेखन!✍️������
उत्तर द्याहटवा