मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

नाती गोती

 

कोणा सांगावे दुःख
कोणा पुढे हात पसरू
धाव घेई उराशी लावून
कसं तरी बरं व्हावं लेकरू

न असता गाठी तो पैका
कोणी म्हणलं का करीन मदत
दीन दीन अशी भटकले
कोणता हात नाही पुढे सरत

दुःख हेच कडवे या जगात
ना जाणे कोणी कोणाचे दुःख
सुखाचे असती सारे सोबती
पुढे पुढे नाचती असता सुख

राहील उभा तोच पाठीशी
दिला जन्म तो विठू पांडुरंग
नाती गोती इथे नसे कामाची
वेळी दाखविते आपले रंग

**सचिन विश्राम कांबळे**


७ टिप्पण्या:

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...