कोणा सांगावे दुःख
कोणा पुढे हात पसरू
धाव घेई उराशी लावून
कसं तरी बरं व्हावं लेकरू
न असता गाठी तो पैका
कोणी म्हणलं का करीन मदत
दीन दीन अशी भटकले
कोणता हात नाही पुढे सरत
दुःख हेच कडवे या जगात
ना जाणे कोणी कोणाचे दुःख
सुखाचे असती सारे सोबती
पुढे पुढे नाचती असता सुख
राहील उभा तोच पाठीशी
दिला जन्म तो विठू पांडुरंग
नाती गोती इथे नसे कामाची
वेळी दाखविते आपले रंग
**सचिन विश्राम कांबळे**
अप्रतिम रचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर रचना!✍️������
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा