मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

बाबा गातो अंगाई

नीज नीज माझ्या बाळा
बाबा गाती तुला रे अंगाई 2
कुठे आज गेली नीज तुझी
बाबा झोपवी तुज बनूनी आई

सुमसान झाल्या वाटा
शांत झाले पक्षी प्राणी
पुन्हा आज जाग्या झाल्या
आईच्या तुझ्या आठवणी

रोज पाळण्यात झुलवूनी
झोपवी तुला तुझी आई
नीज तुजला नाही येता
गात होती रे ती अंगाई

नाही सखा ना कोणी सोबती
तूच सखा तूच सर्व काही
करीतो विनवणी बाबा तुझा
तरी तू बाबाचे ऐकत नाही

किती करू अजून रे धडपड
माया ती शेवटी आधुरी राही
तुझ्या पुढे हरलो मी आता
सांग कसा बनू मी तुझी आई

**सचिन विश्राम कांबळे**

५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सुंदर अंगाई गीत लिहुन मनात एक जाणीव निर्माण केली😊😊😊👍👍👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचना.... खुपच ह्रदयस्पर्शी 👌👌👌✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...