पाह पंख कोण तुझे झाले
त्यात बळ कोणी रे भरले
दिले तुज सारे आपले बळ
ना पाहिले स्वतःकडे काय उरले
फड फड पंखांची तुझ्या
ना पहावली कधी त्यांस
घ्यावी उंच भरारी पिल्लाने
हीच नित्य मनी धरली आस
घेतली उंच झेप तू जेव्हा
पाणावले आनंदाने ते डोळे
शिकविले तुज अवरोध भेदण्या
सोडविण्या संकटाचे जाळे
माणूसच ते या आशेत जगले
वृद्धवयात काठी बनून देशी आधार
फेडशी पांग कधी तरी याचे
तूझेवरच त्यांच्या जगण्याची मदार
**सचिन विश्राम कांबळे**
व्वाऽ..!
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
खुप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना सचिन
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌✍️✍️🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवा