रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

परत कशी भेटेल

 

चार आजूबाजूची माणसं
तेवढाच आनंद जीवनाचा
गप्पा गोष्टी करायच्या त्यांच्या बरोबर
दिवस कसातरी ढकलायचा

वय झालं आता
काय बोलते काय करते
कोणाला काय बोलावं कसं वागावं
समजत नाही भान हरपून जाते

असंच काय सांगितलं असेल कोणाला
काही आठवत नाही व कळत ही नव्हते
मुलगा सून दोघेही माझ्यावर खेकासाले
घरच्या गोष्टी कशाला बाहेर सांगायच होते

मला ते कळलंच नाही
काय घडलं काय चूक माझ्याकडून झाली
सामान गाठोडं बांधलं माझं
वृद्धाश्रमात रवानगी माझी केली

सुटत नव्हतं घर जे मायेनं बांधलेलं
नातवंडानवरही खूप होता लळा
मुलगा सून नातवंड सोडून जायचं
काळजात येत होत्या कळा

असेल चूक माझी झाली
म्हणून एवढी मोठी शिक्षा दिली
अरे म्हातारी झाली आई तुझी
म्हणून काय बाहेर काढून फेकली

असू दे प्रायश्चित्त माझं हेच
आश्रमात राहून कड सोसेल
तू मात्र सुखी राहा माझ्या बाळा
पण आई एकच असते परत कशी भेटेल..

**सचिन विश्राम कांबळे**


५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्द रचना...खूप ठिकाणी अस बघायला मिळतं..यांना यांचा चुका स्वतः त्या वयात आल्यावरच समजणार...👍👌✍️🍫

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर शब्द रचना खूप खूप छान👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी खरं आणि भावस्पर्शी लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...