शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

माहेर

 

कसं विसरु ते

आईचं मायेनं वाढवणं

बाबांची काळजी

भावाच्या सोबतीच देणं


कसं विसरु ते

मायेनं नटलेल घर माझं

आईचं गोंजरणं अन्

पोटात सांभाळलेलं ओझं


कसं विसरु ते

माझं रोज रुसण बसणं

आईचं मनवणं

मी बाबांकडे तक्रार करणं


कसं विसरु ते

भावा बरोबर भांडणं

कामाचा कंटाळा करणं

आईनं न बोलता ते सर्व करणं


कसं विसरु ते

बालपणात खेळणं

बागडणं नाचणं हिंडणं

बिन्धास्त मजा करणं


कसं विसरू ते

आपल्या मर्जी च जगणं

ना कामाचा ताण ना चिंता

ना कोणाचं रागावणं


आठवण येते ती

खूप माहेरची मला

लग्न झालं सासरी आले

अन् माहेर परकं झालं मला


आठवणी त्या खूप माझ्या

रात्र दिवस जो तिथेच रंगला

मायेच्या त्या सावली खाली

देह माझा तो वाढला


कसं विसरु हे सारं

गर्व स्त्री जन्माला

आईची माया, बापाचा लळा जिथं

कसं विसरु माहेरघराला....


**सचिन विश्राम कांबळे**


५ टिप्पण्या:

  1. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली.
    खरच सासरी गेल्यानंतर माहेरची माया नाही विसरू शकत कोणीही..

    उत्तर द्याहटवा
  2. हृदयस्पर्शी रचना सासरी गेल्यावर माहेरची माया
    कोणी विसरू शकत नाही!✍️✍️✍️👌👌👌👌👍👍👍

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...