शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

आई तुला काय पाहिजे

 

माग आई तुला काय पाहिजे
जे जे आहे माझ्याकडे
अर्पण ते ते तुझ्या चरणात
कळा सोसून जन्म तू दिला मला
नजारा या विश्वाचा तूच दाखविला
जिवापलीकडे सांभाळ केला
संस्कारचा काडा पाजला
शिकविले तूच
तूच घडविले मला
सत्याचा मार्ग दाखवत
घाडवणीचा विडा माझा तूच उचलला
शिकवला खरेपणा शिकवली माणुसकी
कृतज्ञता ,कर्तव्यदक्ष,चांगुलपणाचे दिले धडे
आयुष्य माझे तुझेच देणे
सांग आई तुला काय हवे
उपकार तुझे कैसे फेडू
सेवेचा तुझ्या लाभ दे मला
दुसरे तुझ्याकडचे काही नको मला
इतके दिवस देत आलीस
तेच प्रेम जन्मभर दे मला

*सचिन विश्राम कांबळे*


१५ टिप्पण्या:

  1. खूप छान लिहलस सच्चू 👌🏻👌🏻👌🏻 आईचा आशीर्वाद नेहमीच असतो 🙌🙌

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान लिहीलयस ��������������������

    उत्तर द्याहटवा
  3. आई...कधीच न संपणारे आणि कधीच लिहून पूर्ण न होणारा ग्रंथ... सुंदर लिहंलय!✍️👌👌👌🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. आईची महती कधीच न संपणारी असते... सुंदर शब्दात मांडली आहे सचिन...👌👍✍️🍫🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे अतिशयोक्ती कुठे दिसत नाही khopch छान

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌
    अप्रतिम म 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  7. खुपच सुंदर अप्रतिम रचना 👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  8. व्वा व्वा आई म्हणजे प्रेमाचा झरा कधीही नाही आटणार खूपच सुंदर रचना केली दादा ������

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...