आखूड मार्ग तो कारे निवडावा
सत्याचा असावा नको लोभ ||
पाया न रचता स्वप्न कळसाचे
आभास मनाचे टिकेल का ||
का धावावे मागे लागे ना हातास
मनाचे ते भास मृगजळ ||
दिले जे देवाने सूख ते मानावे
लोभ का करावे मिळे माती ||
कष्ट जो करील मिळे त्या सावली
विठ्ठल माऊली पाठी उभी ||
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिमच रचना ....👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेखन ✍️✍️👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा