किती वेळा सांगु किती घालू साद
मिळेल का दाद पांडुरंगा ||
सांगु वाटे तुला मनातले काही
जीवा कळा येई दुःखा पायी ||
यावी तूझी स्वारी नयनी ही आस
न्याव्हा संग धास दुःख पार ||
ओसाड जमीन पिकं ना रे धान
कासविस मन चिंतेपायी ||
बनून तू मेघ बरसावे आज
थोडं पाणी पाज जाये जीव ||
मना हेची वाटे तूच हरी दाता
सांगे येता जाता दुःख हर ||
पोसावे रे कैसे घरा नाही धन
पडे खाली मान लाचार मी ||
नाही मागे जादा मूठ भर द्यावे
कसे तरी जावे आला काळ ||
पाहतो रे वाट पावशी तू मज
बाळ हे रे तुझं पांडुरंगा ||
*सचिन विश्राम कांबळे*
खूपच छान ...!!
उत्तर द्याहटवाअप्रतिम अभंग....👌
आबा 🙏
खूपच छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम अभंग सचिन
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर अभंग रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली .
उत्तर द्याहटवाखूप छान अभंग