मीच आहे राजा झालो इथे
माणसं सारी माझी गुलाम
सर्वांवर अधिराज्य माझं
सारेच ठोकतात मला सलाम
आदेश माझा सर अखों पर
हुकूम माझे पाळावे लागते
बोलणं,बघणं,मेसेज करणं
सारं माझ्याविना शक्य नसते
बँका ही आता मीच झालो
पैसा देणे घेणे परवानगी लागते
मी नाही म्हणालो तर
देवाण घेवाण होतंच नसते
कागदपत्रे,माहिती,फोटो,संगीत
सर्वच हे माझ्यातच वसते
माणसांचा हा लेखा जोका
सारे माझ्या हातातच असते
अति वापर करून माझा
मेंदू,डोळे निकामी करून घेतले
तासोंतास वाया घालवून
तारुण्यात सारे प्रौढ झाले
हा... हाहा ..हा..हा.......हा
माणसे माझे गुलाम झाले
**सचिन विश्राम कांबळे**
वाह मस्तच सच्चू 👌🏻👌🏻 काही वेगळाच विषय घेतलास 😊
उत्तर द्याहटवाफारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर...मोबाईलनी काही गोष्टी सुलभ झाल्या असल्या तरी अनेक दुष्परीणाणम आहेत मोबाईलचे...छान लिहीलय..अप्रतीम... शुभेच्छा सचिनदादा पुढील लिखाणासाठी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवावा, अतिशय सुंदर आणि मार्मिक रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवा