भाव ऐसा मनी जोडूनी दोन्ही करा
जागा हो आता श्री हरी पांडूरंग जरा
म्हणी मन असं करावं काही,मिळवावी दाद
जपलेल्या भक्तिन घालावी तूज साद
सोसेल ती किती जपावी ती नाती फार
सासरचा छळ त्यात कधी कधी मिळेही मार
पेटला तो देह अंग लाहीलाही होई सारं
उघड नयन वाचवाया धाव,पडली ती गार
उगा का करशी जीवाचा रे त्राण
फाटले जे मन निघाला तो प्राण
कपाळकरंटा,कधी वांझ,कधी कुलटा बोलावं
नको हा स्त्री जन्म देवा,तिस असं का वाटावं
मनी फार वाटे ऐसा, करावी राखणं
बदलावे सारे विचार ना तुटावे तिचे मन
साद ही तुज देवा प्रकट तू होशी
करुनी बलात्काऱ्यांचा वध मिळावी फाशी
पाहुनी चीर हरण पाठीशी तूची उभा
राखलीस तूच नारीची या लाज
बळ द्यावे तिशी होऊनी दुर्गा
करावी अत्याचारचा वध,नव नारी घडावी आज
पाहता जन्म तोची तिस मारी
कुठे जन्माला असता,नसता ती नारी
घ्यावं तू परत इथे जन्म,करण्यास रक्षा
स्त्रीने जगावं, स्त्री जगावी,वाचावी हिच घाल भिक्षा...
*सचिन विश्राम कांबळे*
अतिशय हृदयस्पर्शी रचना👌👌👌👌✍️✍️✍️✍️
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी..... 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना खूप सुंदर व्यथा मांडली स्त्रीची
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌🏻👌🏻 निःशब्द 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाह्रदयस्पर्शी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाएका स्त्रीला किती दिव्यातून जावं लागतं..हैंखूप छान दर्शवल आहे...हृदय स्पर्शी...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाAtishay sunder lihlay 👌👌👌
उत्तर द्याहटवा