शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

बहिण

मायेची माऊली
प्रेमाची सावली
पाठराखीन म्हणून देवाने
बहिण पाठवली

बालपण तिच्या सोबत
कसं वेगळं असतं
कधी हसत खेळत
कधी रुसवा फुगव्याच असतं

रागाने भांडतेही ती
खोड्या करून हसवते ती
अभिमान तिला बहिण असल्याचा
जीवाला जीव देते ती

क्षणात हसणारी
क्षणात रडणारी
प्रेमानं जवळ करणारी
बहिण असते माया देणारी

मोठी असली की दम देणार
छोटी असली की रुसणार
आईरुपी दुसरी माय
या जगात बहिणी शिवाय नाही भेटणार

बहिण भाव छान गोड अस नातच वेगळं
भाऊ म्हणजे,धीर,रक्षण पूर्ण माहेर
बहिण म्हणजे प्रेम,माया,छाया,ढाल
सगळं एकवटून मिळालेला गोड आहेर...

*सचिन विश्राम कांबळे*

१३ टिप्पण्या:

  1. सुप सुंदर रचना सचिनदादा....अप्रतीम.... ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा व्वा खुप सुंदर नात्याची वीण समजवली दादा 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम च 👌👌👌👌👌
    हृदयस्पर्शी 👌👌👌👌👌👌🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुरेख आणि एकच नंबर रचना 👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️🙏

    उत्तर द्याहटवा
  5. अगदी बरोबर लिहीलयस आई सारखी माया बहीणी शिवाय कुठे ही मिळणार नाही 👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  6. खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी रचना 👌🏻👌🏻👏👏

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...