एक सकाळी कळीकडे पाहून
विचार करत होते बसले
फुलणाऱ्या त्या कळीस पाहून
मनी चिंतेचे वादळ उठले
उद्या ती कळी फुलणार आहे
फुलून सुंदर फुल बनेल
वाईट दृष्टी ना पडो कोणाची
फुलण्या आधीच ते गळेल
सताविते मना हीच चिंता
कोणा हाती ते फुल पडेल
देवा चरणी वाहिले जाईल
की कोण डोईवर सजेल
कोणी मध्येच येऊन
बिनकामी तर नाही ना तोडेल
पाकळी पाकळी तोडून अशी
नाही ना कोणी विखरेल
इच्छा मनी सजावे डोईवर
चरणी देवाच्या पडावे
या नको ते कोमेजून जावे
हीच चिंता मनी खूप सतावे
**सचिन विश्राम कांबळे**
खुपच सुंदर रचना 👌👌👌🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना... अप्रतीम.. ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम
उत्तर द्याहटवाखुप सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर सचि
उत्तर द्याहटवाएका पालकाची खुप छान वैचारीक बाजू मांडली आहेस
उत्तर द्याहटवाखुप छान शब्दात उपमेय रचना केलीयस 🙏🏼🙏🏼
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर....
उत्तर द्याहटवामस्त ✌️
उत्तर द्याहटवाछानच लिहिले सरजी!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा