गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

ती कळी

 


एक सकाळी कळीकडे पाहून
विचार करत होते बसले
फुलणाऱ्या त्या कळीस पाहून
मनी चिंतेचे वादळ उठले

उद्या ती कळी फुलणार आहे
फुलून सुंदर फुल बनेल
वाईट दृष्टी ना पडो कोणाची
फुलण्या आधीच ते गळेल

सताविते मना हीच चिंता
कोणा हाती ते फुल पडेल
देवा चरणी वाहिले जाईल
की कोण डोईवर सजेल

कोणी मध्येच येऊन
बिनकामी तर नाही ना तोडेल
पाकळी पाकळी तोडून अशी
नाही ना कोणी विखरेल

इच्छा मनी सजावे डोईवर
चरणी देवाच्या पडावे
या नको ते कोमेजून जावे
हीच चिंता मनी खूप सतावे

**सचिन विश्राम कांबळे**


१२ टिप्पण्या:

  1. एका पालकाची खुप छान वैचारीक बाजू मांडली आहेस

    खुप छान शब्दात उपमेय रचना केलीयस 🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...