बरं झालं तो गेला
का बरं तो असं म्हणाला
बोचले ते शब्द
हादरवले सरणाला
कोणा बद्दल वाईट बोललो
असं तर आठवत नाही
कोणाचं वाईट चिंतलं
हे ही लक्षात येत नाही
मग का असं तो म्हणाला
बरं झालं तो गेला
आज कळलं या सरणावर
नकळत घडतात हातून चुका
कळत नसतं त्या वेळेला
मग मेल्यानंतर शोधायचा का मोका
म्हणून तो असेल म्हणाला
बरं झालं तो गेला
मनात तुझ्या सलत होतं
आधीच ते बोलायचं होतं
चूक बरोबर केली असती
जर त्यावर पांघरून घातलं नसतं
त्या वेळेलाच असता अडवला
तर आज म्हणाला नसता
बरं झालं तो एकदाचा गेला
दाखवून द्या चुका
चुका माणूसच करतो
प्रायश्चित्त आहेना पर्याय
चुकातूनच माणूस शिकत असतो
मेल्यावर त्याचे गुण गाणार
या त्याच्या चुका काढणार
तेव्हा चुका दाखवून काय फायदा
फक्त हा डाग मरणानंतरही त्याच्यावर राहणार
***सचिन विश्राम कांबळे***
छानच 👌👌👌🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम सचिन
उत्तर द्याहटवासद्यस्थितीवर वार करणारी सुंदर रचना सर। 🤗✌️
उत्तर द्याहटवावास्तविकता आहे खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवाखुप सुंदर पण..कटु वास्तवदर्शी, अप्रतीमश रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाVva khup sundar apratim rachana keli mnala bhavnari 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना...अन् हृदयस्पर्शी!✍️��
उत्तर द्याहटवाअतिशय हृदयस्पर्शी कविता 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवासुंदर रचना....👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी रचना☺️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखरच वेळेत चुका दाखवून समोरच्याला योग्य मार्गदर्शन केले तर खूप गोष्टी वेगळया होतील. बर झाले गेला तो अस म्हणण्याची वेळ नाही येणार.
उत्तर द्याहटवा