मीच माझा एकटाच
सोबत नसलं कोणी जरी
माझ्यात मी रमतो
कोणाचं नसतं ओ घरी
बाबू चिनू सच्चू मोनु
ऐकू यावं कधीतरी
मी एकटाच राहतो
आईबाबा कुठे असतात घरी
शब्द ते हरवले कुठे
कोण बोलणार माझ्या सवे
प्रेमानं मायेनं बोलायला
आई बाबा तर घरी हवे
माझा मी मलाच शोधतो
टिव्ही समोर एकटाच बसतो
थोडाही वेळ मला दिला नाही कोणी
आईबाबा असून ही पोरका मी
भविष्याचा विचार हवा कशाला
आजचे हाल काय माझे ते तर जाना
प्रेम हवंय हवी माया तुमची
नको एकटेपणा नको मना यातना
**सचिन विश्राम कांबळे**
सद्य स्थिती आहे आताच्या काळात 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप छान 👌👌👌
खुप छान रचना 👌👌
उत्तर द्याहटवागणेश दळवी
Khup sundar bhavana vyakta kealya sachin...👍👌✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाअतिशय भावस्पर्शी रचना केली सर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख रचनाविष्कार!👌👌👌
उत्तर द्याहटवा