तहान अन् पोटा भुकेसाठी
वण वण बिचारे ते फिरती
तळपणाऱ्या सूर्याच्या उष्णतेने
लाहीलाही जीवांना त्या होती
ना इशारा,ना खाणा खुणा
मुके बिचारे ते काय बोलती
ना बोलके भाव,ना असे शब्द..
नजरेने कसे कुणा खुणवती
एक वाटी पाणी, पसाभर दाणे
पुरेसे होईल वाटेच्या वाटसरुना
मिळे पुण्यांचा तो वाटा घेण्याची संधी
मुक्या जीवांचे जीव वाचवताना
एक एक थेंब थेंब ते पाण्याचे
वाचवी एक एक जीव बहु मोलाचे
पाण्याचे ते मोल साऱ्यांनी जाणून
करावी सुरुवात कुणा नव जीवन देण्याचे
**सचिन विश्राम कांबळे**
खुप सुंदर रचना केली मित्रा
उत्तर द्याहटवाअप्रतिम भावना मांडल्यात तू सचिन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर लिखाण सचिन
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदरच अप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवा