सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

मम्मी पप्पा तुमचं प्रेम हवं

तुमच्या असण्या नसण्याच्या
मम्मीपप्पा किती ओ नोंदी ठेवू
तुमच्या शिवाय एकटाच आहे मी
बोचतो हा एकांत कसा मी राहू

का असं दूर केलतं मला तुम्ही
दिली मनावर न भरणारी चिरका
तुम्ही असूनही मम्मी..पप्पा
का असा झालो आहे मी पोरका

नको मला श्रीमंती नको तो पैसा
का करता भविष्याची माझ्या चिंता
हवंय तुमचं फक्त प्रेम मला
कसा सोडवू प्रेमाचा तुमच्या हा गुंता

द्या थोडा वेळ मला खेळा माझ्याशी खेळ
प्रेमाने हाक मारून मायेनं गोंजारावं
डोळ्यातले अश्रू माझ्या पुसून
लाडाने कधीतरी जवळ मला घ्यावं

कळेल का मन माझं कधी तुम्हाला
कळेल का तुम्हाला माझी दशा
तुम्ही माझ्यापासून दूर ना व्हावे
हीच जीवनातली सगळ्यात मोठी आशा

***सचिन विश्राम कांबळे***



६ टिप्पण्या:

  1. खुप भावनाप्रधान लिखाण सचिन, अप्रतिम सुंदर लेखन, आईबाबांचे आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहतील

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय भावस्पर्शी रचना केली सर 👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...