बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

पक्षी बनून पहावं

पक्षी बनून वाटे उडावे
घ्यावी उंच उंच भरारी
गरगर भ्रमण करीत जावे
निळ्या निळ्या अंबरी

खेळावे बागडावे तिथे
झुळझुळ वाहे पाणी जिथे

सागरावरून उडावं
वेलींबरोबर डोलावं
उंच उंच झाडच्या फांदीवर
सहज जाऊन बसावं

वाऱ्याच्या झोतात वाहून
मन करेल तिथं विसावं
पंखांचा पिसारा फुलवून
फुलांना आपल्या कुशीत घ्यावं

हवं ते करावं इकडून तिकडे
जीवन स्वच्छंदी जगावं
सुंदर दिसणाऱ्या निसर्गाला या
पक्षी बणून अगदी जवळून पाहावं

**सचिन विश्राम कांबळे**



५ टिप्पण्या:

  1. तुझी कविता खुप सुंदर असते व शब्द पण सुंदर असतात

    उत्तर द्याहटवा
  2. हो खरच वाटत फुलासारखं उडाव जिथे आवडत तिथे जाऊन थांबावं खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...