शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

लेक

 

असा कयास बांधून बापाने
थाट पाहिला धाडली लेक सासरी
असेल लेक माझी सुखांत नांदत
सर्व काही न मागता असेल पदरी

पण चंद्र होता झाकोळलेला
मिट्ट काळोख होता तिच्या जीवनी
कलह किती झाला घरी तरी
कधी सासर सोडलं नाही तीनी

प्रयत्न केला आनंदी राहून
क्षणभर का होईना दुःख विसरण्याचा
निर्धार हाच केला... आहे त्यात
समाधान मानून जगण्याचा

लढण्याची जिद्द होती म्हणून
आहे त्या परिस्थितीशी लढली
किती वेदना होत्या मनात
अवस्था मनाची तिच्या ओळखता नाही आली

मळभ हे मनावरचे गेले नाही तरी
नात्याची विण उसवू दिली नाही
उगाच नको वाद वाढायला म्हणून
आईबाबाला सूगावा लागू दिला नाही

सार काही निमूटपणे सोसलं
कारण बापला टेंशन द्यायच नव्हतं
इतकं सहन करून नशिबात
वनवास भोगणंच लिहिलं होतं

**सचिन विश्राम कांबळे**


७ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सुंदर शब्दाची गुंफन असलेली कविता सचिन

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचना.. एका सासवाशीन ची व्यथा छान मांडली आहे...👌👍✍️🍫

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...