किती पहावी स्वप्न त्यांचे कडून
का त्यांच्या विचारांना करावे वजा
आपली मते,विचार त्यांचेवर लादून
का ठेवता त्यांचेवर अपेक्षांचा बोजा
असतील कदाचित त्यांचीही स्वप्ने
आपले स्वप्न का पूर्ण करून घ्यावे
नसेल जर त्यांना रुची त्या कशात
तरी का त्यात उडी मारण्यास लावावे
तुमच्या अपेक्षांचं ओझ त्यांना वाटतात
बेड्या घालून भोगलेला तुरुंगवास
न करता आलं तुमच्या अपेक्षा स्वप्न पूर्ण
जातात घर सोडून वा घेतात गळफास
नका असं क्रूर वागू त्यांचे सोबत
मित्र बनून जाणून घ्या त्यांची मनं
आवड निवड ठरवू द्यावी त्यांनाच
नका घेऊ हिरावून त्यांचं हे जगणं
***सचिन विश्राम कांबळे***
खुप छान...
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी... प्रेरणादायक रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासच्चू जीऽ..!
उत्तर द्याहटवाव्वाऽ....!
खूपच छान मांडलय सह है वास्तव दर्शन..!
मनाला भावणारे शब्द आणि विचार 👌
खूप खूप शुभेच्छा..!🌷
☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
आबा 🙏
अतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवासचिनजीऽ
उत्तर द्याहटवाछानच लिहिता ..👌
नेहमी पोस्टर करत रहावे..!
आबा
🙏