आजही आठवतो नशिबाचा आसुरी काळ
जो मी आणि ताईने सोबत काढला
अजूनही आठवते आई बाबा नसता
तो प्रत्येक क्षण जो एकत्र जगला..
अजूनही आठवतो खडतर प्रवासातील मिट्ट अंधार
ना कुणाचं प्रेम ना कुणाचा आधार
अजूनही आठवतो तो ओसाड रस्ता
ना आजूबाजूला घरं ना कुठेच झाड
कोसो मैल दूर घरा पासून असलेली शाळा
रस्त्यात न कसली सावली ना कुठेच आड...
दुपारी जेवणाच्या सुट्टीत भर उन्हात
पोटाची आग विझवायला निघायचो घरी
अजब न्याय त्या विधात्याचा
चटके डोक्यावरही अन् पाया खाली
काय सोसणार ती उष्मेनी वरघळणारी कात
धुराल्याचा रस्ता आणि कोचं गवतात
चटके पायाला आग मस्तकात
गवतावर धाव भाजता पाय धुरल्यात
पण त्यावर चालनही कुठे नशिबात
टोचायची कोचं चप्पल नसता पायात
झुडूपाचा पाला तोंडून पाया पुढे टाकायचं
त्यावर उडी मारत मारत घर गाठायच
घरात हंडी उघडुन बघता
शिल्लक काहीच अन्न नासायचं
दोन लोटे पणी पिवून पोठभर
परत धरायचो शाळेची वाट
परत तोच रस्ता तेच ऊन तोच क्रम...
शेवटी होतं दुसऱ्याच्या हातावर पोट
कधीच नाही विसरणार
नेहमीच लक्षात राहणार...
*सचिन विश्राम कांबळे*
*कोचं -(गावठी शब्द) सुई सारखी टोचाणारी छोटी वनस्पती जी जमनीच्या अर्धी पोटात आणि अर्धी बाहेर असते...
खुप भावस्पर्शी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाहेच कठीण क्षण आपल्याला जगण्याची दिशा दाखवतात... सुंदर रचना....👍👌✍️🍫🍫✍️🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवा