स्त्री...या शब्दा पुरतीच
मर्यादित मी राहिले
स्त्री म्हणून जन्मले
हेच का मला नडले
वेदना अपमान सहन करणं
हेच होते माझे जीवन
बिन्धास्त निडर जगणं
कुठे नशीबी.. मेलयं मन
प्रत्येक वेळी मीच नमले
पण हे जग बघून ही आंधळे
मलाच द्यावी लागली अग्नीपरिक्षा
स्त्री जन्म म्हणून का ही शिक्षा
अपेक्षा कोणाकडे करू
कोण घालेल फुंकर या वेदनेला
स्त्रीला समजतात जे फक्त एक वस्तू
कोण समजावेल या समाजाला
बस झाले आता असह्य हे
कसं मी सहन करत जाणार
कधीतरी उजाडेल नवी पहाट
अस्तित्वासाठी माझ्या आता मी लढत राहणार....
***सचिन विश्राम कांबळे***
सुंदर रचना केली ��
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर शब्दरचना..👌✍️👍🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर सच्चू ������������
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा