नीज नीज माझ्या राजसा
माझ्या सोन्या रे पाडसा
बघ बघ रे रात्र झाली
चांदोबाची ही स्वारी आली
चांदणी आकाशी चमकती
जणू भासे दीप रे जळती
मिट पापण्या रे बाळा
आईचा तुला नाही का लळा
खेळ तुझा का रे संपेना
खुंगराचा तुझा रे पाळणा
नीज नीज माझ्या राजसा
माझ्या सोन्या रे पाडसा
दरवळली बघ रातराणी
बाळाला माझ्या पेंग आली
गोंडस बाळा ने रे माझ्या
पाळण्यात गाई रे केली
नीज नीज माझ्या राजसा
माझ्या सोन्या रे पाडसा
**सचिन विश्राम कांबळे**
अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर अंगाई गीत 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम अंगाई गीत 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवावाहहह... खुप सुंदर ह्रदयस्पर्शी अंगाई गीत...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा