कॉफी पिऊन झोप
मग जागा राहशील
वाटलंच होतं तू मला
असच काहीतरी बोलशील
पण कॉफी पिऊन नाही
ते आठवून आहे जागा
फाटक्या नशीबाचा मी
तुझ्या मनात माझी आहे कुठे जागा
पैसे नाही म्हणत असतानाही
कॉफी शॉप मध्ये मला नेलं
फाटका किसा माझा तरी
बिल माझ्या हातात थोपवलं
त्याची लाज नाही वाटली मला
वाईट वाटलं माझं हसू केलं
आईच्या औषधाच्या पैसे देऊन
तूझ्या अहंकारच बिल भरलं
प्रेम केलं ग मी तुझ्याशी
मला मी तुझ्यात होतं शोधलं
फक्त गरीबी दिसली माझी
पण माझं प्रेम नाही कळलं
आज मी तुझ्या प्रेमात
इथे तडफडत जरी असेन
उद्या तू माझ्या साठी तडफडशील
पण कदाचित मी जवळ नसेन...
अप्रतिम लिहिलंयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाआर्त भावना खूप छान मांडल्या आहेत....👍👌✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाभावस्पर्शी रचना 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप मस्त... सुंदर!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा