निसर्गाचा कोप झाला
वादळासह मोठा पाऊस आला
पावसाचा वेग वाढला
पाण्याने पूर्ण मळा भरला
बघता बघता नदी पात्र भरले
ओसंडून नदी पात्र वाहू लागले
लेकरू तिचे अडकले पलीकडे
तिचे बाळ तिकडे आणि ती इकडे
कासावीस झाला जीव तिचा
प्रयत्न करी वाचविण्याचा
पाणी नदीचे वर चढू लागले
अश्रूंचे तिचे बांध फुटले
हंबरडा फोडला तिने
शक्य नव्हते त्यास वाचविणे
आईचा जीव तो राहवेना
पाऊस काही केल्या थमेना
धैर्य करून तिने मारली उडी
देवाने ही कुठे मारली होती दडी
पाण्याचा झोत तिस आवरेना
पायास जमीन कही लागेना
नियतीने खेळ वेगळा केला
पाण्यात देह तिचा वाहून नेला
प्रयत्न तिचे वाया गेले
मुलास वाचविण्यासाठी प्राण दिले
शेवटी ती एक आई जिद्दीची
तयारी नव्हती कशात ही हरण्याची
ओंडके पकडुन आली किनारी
मिळाली नियतीस कोणी टक्कर देणारी
माय लेकाची गाठ झाली
प्रेमा पुढे ती नियातीही हरली
आई जगतात आहेच वेगळी
ऋणी तिचे आपण आहोत सगळी...
**सचिन विश्राम कांबळे**
वाह... अप्रतिम रचना... 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअतिशय हृदयस्पर्शी रचना ������
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा