सोडून गेलीस ग आई तू मला
दुसऱ्या कोणा भरवश्यावर
कसं राहू तुझ्याविना
सोडलं ग तू मला माझ्या नशिबावर
खूप आठवण येते ग तुझी आई
दुसऱ्याच्या आईत तुला शोधत राहतो
रोज तुझ्या शिवाय करमत नाही ग
फक्त तुझ्या आठवणीतच ग जगतो
का माझंच नशीब इतकं फाटकं
तुझं प्रेम मला मिळालं नाही
इतक्या लाहणपणीच झालो पोरका
का माझ्याच नशिबात नाही आई
दुसऱ्या कोणा आईला भरवताना बघितलं
की तिच्यात तूच ग मला दिसतेस
उपाशी पोटी कधी असल्यावर
भास होतो तूच मला भरवतेस
आई का ग अशी अर्ध्यावर सोडलंस
आठवण येते येणा ग तू परत
तुझ्या विना हे जगणं नकोय मला
तू नाही आलीस तर मी बसेन असाच रडत
***सचिन विश्राम कांबळे***
खुपच भावस्पर्शी रचना...😢
उत्तर द्याहटवा🙏मातृदेवो भव:🙏
ह्रदयस्पर्शी लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप विदारकता मांडली
उत्तर द्याहटवाएक एक शब्द ... हृदयस्पर्शी!✍️😔😥
उत्तर द्याहटवासुंदर हृदयस्पर्शी 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाही रचना आहे की वास्तव घटना आहे खूपच छान लिहिलंय
उत्तर द्याहटवानाही फक्त रचना आहे
हटवा