रोज मला टवकारून बघते
मी पाहिला की गालातल्या गालात हसते
ती का अशी करते काही कळत नव्हतं
नव्हतं समजतActually पाणी कुठे मुरते
अचानक आली समोर आणि
माझी चांगलीच तारांबळ उडाली
अंग थरथरले पोटात आले गोळे तोच
मी तुझ्यावर प्रेम करते म्हणाली
अपेक्षा माझ्याकडून तिला प्रेमाची
पण मन माझं साफ आहे
कसं समजावू त्या प्रेम वेडीला
की मी दोन मुलांचा बाप आहे
आता काय सांगावं कळत नव्हतं
हातात लाटणं घेऊन दुर्गा रूप दिसलं
पूर्ता जागा झालो म्हणालो
नाय जमायचं लग्न आहे माझं झालं
तरी म्हणाली चालेल नो प्रॉब्लेम
अग बाई तुझा नो प्रोब्लेम असेल
दारात उभी दिसतेय मला ती
डोक्यावरच माझ्या एकही केस नसेल
त्यामुळे बाई तू कर मला माफ
कारण खरचं मी मनांने आहे साफ
***सचिन विश्राम कांबळे***
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवालई भारी लिहलंय!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअरे देवा ...काय हे सचिन 👌🏻👌🏻👌🏻😊
उत्तर द्याहटवा