हरीणच पाडस
कूठे तरी हरवलं
कावरी बावरी हरीण
कुठे कुठे नाही शोधलं
कासावीस झाला जीव
व्याकुळतेने विव्हळलं
जंगलभर धावली
पण कुठेच नाही सापडलं
भक्ष नसेल ना झालं
चिंतेत साफ गळून गेलं
डोळ्या अश्रू वाहत
प्रत्येक प्राण्यास विचारलं
एक अस्वल पुढे आलं
धीर त्याने तिला दिला
सापडलं लेकरू तुझं
आशेचा दीप पेटविला
पहाट झाली किलबिलाट झाली
पाडस तिचे परतले
पाहून त्यास धावत सुटली
जवळ घेऊन आनंदाश्रू निघाले
***सचिन विश्राम कांबळे***
अप्रतिम रचना..!
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
आईची आतूरता खुप छान रेखाटलीयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवावाहहह...आईची व्याकुळता छान दाखवली आहे...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय ����
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम
उत्तर द्याहटवाएका आई ची घालमेल सुंदर रेखाटली आहे...🌹👍✍️🍫
उत्तर द्याहटवाअतिशय भावस्पर्शी रचना ������
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा