रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

बाबा

 

खडतर प्रवास जीवनाचा
त्यात अपेक्षा या लाटांचा मार
कधी हृदयावर आदळतात
तर कधी मनावर होतो वार

त्यात माझा बाब भरडला जातो
पण आम्हाला शिकवून मोठं करण्याचा
निर्धार त्याने केलेला असतो

चपला झिजल्या त्याच्या
या खडतर प्रवासात चालून पण उफ नाही केलं
डोक्यावर बर्फ ठेऊन निघाला
चालत राहिला समजून पायाखाली फुलं

निर्धार एवढाच आहे जीवनात केला
त्या झिजनाऱ्या पायाखाली
सुखा चा गालिचा अंथरायचा आहे मला
नशिबाची भोकं बुजवून
भविष्यात आधार द्यायचाय त्याला

खूप सोसलं खूप भोगलं त्यानं
आतून पोकळ वासा तो झाला
वादळ आलं तरी घराचं भार
त्यानं न डगमगता रे पेलवला

दुःख त्याचं त्यांनी कधी नाही दाखवलं
पान चागळाव तस् दुःख चगळुन
चोथ्याचा ही ठाव ठिकाण लागू नाही दिलं

आज तो हाय म्हणून हाय शान
नाहीतर असतं आयुष्य पेटलेलं रान

चार भिंतीचा भरगच्च तो खांब
बाबा तू बस कर... आता तरी थांब

तुझ्या अपेक्षा करणार मी पूर्ण
सुखाचे औषध देऊन
घालवणार ते दुःखाचे अजीर्ण
नको टेन्शन आता मी आहे तू कर आराम
खूप केलंस बाबा तुला खरंच शतशः प्रणाम

***सचिन विश्राम कांबळे***


९ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार...बाबा...कृतज्ञता शब्दगुंफण अप्रतिम!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वडिलांबद्दलची कृतज्ञता छान रेखाटलीय 👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर मनोगत सादर केले आहे...छान शब्द रचना👍💐✍️🍫🍫🍫🍫🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम रचना,खूप भावस्पर्शी 👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय हृदयस्पर्शी रचना, खूपच सुंदर 👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...