हे विठू माऊली मुरली मोहना
करितो वंदना पांडुरंगा ||
पडला विसर तुझा तो रे देवा
भक्ती विसरावा कसा भक्त ||
झाला गर्व तो रे नाती विसरलो
अलिप्त राहिलो अभागी मी ||
हाती झाली चूक द्यावी मज माफी
तू रे सर्व व्यापी दया कर ||
एकटं राहणं ना पटलं मना
समजून घेणा पांडुरंगा ||
हवी तुझी भक्ती शरण मी आलो
एकटा पडलो द्यावी साथ ||
अप्रतिम सुंदर अभंग सचिन
उत्तर द्याहटवावाहहह...अप्रतीम अभंग रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर भक्तीरचना 🙏
उत्तर द्याहटवाखूप खूप छान 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिमच रचना ✍️✍️✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा